गुगल अॅड्सेंससाठी नेमके काय काय करावे ? काय करू नये ? मला कसे मिळाले ?
Marathi Blog - मनात आलं म्हणून
Google AdSense Approval
मेहनत की संयम ? ( इमेज गुगलहून साभार) |
Google AdSense approval मिळाल्यानंतर लगेचच ही पोस्ट मी लिहित आहे. अनेक गैरसमज दूर करण्याचा नि तांत्रिक सुधारणा करत, काही सूचना देण्याचा मी प्रयत्न करतोय. ब्लॉग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी नि विशेषत: ब्लॉगला Google AdSense approval मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी नेमकी माहिती देण्याऐवजी मी मुद्दाम विस्तृत माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. जेणेकरून खरोखर ज्यांना Google Adsense approval मिळवायचे आहे त्यांना मदत होईल.
आधी गैरसमज दूर करूया.
- AdSense च्या मुख्य पानावर एक परदेशी स्त्री सारखी हसताना दिसते आणि असं वाटतं की फक्त आवडत्या विषयावर लिहिलं की झालं. मला तर याच बाईचा आधी फार राग यायचा. आधी तिला महत्त्व देऊ नका.
- AdSense च्या मुख्य पानावर कधीतरी तुमच्या आवडीचा विषय निवडला की ५००० पेजव्ह्यू झाले की अमुक अमुक डॉलर कमाई होते असं साधं गणित डोळ्यांसमोर उभं केलं जातं.
- मुळात AdSense ची ही फक्त एक जाहिरात असते. तिला जाहिरातीप्रमाणेच बघा.
- SEO Ranking चे अनेक लेख अनेक संकेतस्थळांवर वाचायला मिळतात. यात बरेच शिकायला मिळते.
- मी स्वत: Udemy.Com वर काही कोर्स केले जे मला माझ्या कामाशी संबंधित कोर्स रू. ४२०/- ला केल्यामुळे मिळालेल्या अनेक फुकट कोर्सपैकी होते.
- त्या कोर्समध्ये कळलेल्या अनेक बाबींनासुद्धा धक्का बसला आहे हे मला AdSense Approval मिळाल्यानंतर खात्रीने बोलू शकतो. पुढे वाचल्यास कळेलच.
- केवळ आयटी क्षेत्रातील व्यक्तींना किंवा वेबसाईट बनवणाऱ्यांना जास्तीत जास्त पेजव्ह्यूज आणून AdSense Approval करून घेण्याचं तंत्र माहित असतं असं अनेकांना वाटतं.
- मी स्वत: मेकॅनिकल इंजिनीअर क्षेत्रात असून मला कोडींग आता कुठे थोडं कळू लागलंय. गुगलच्या हेल्प फाईल बऱ्यापैकी मदत करतात.
AdSense Approval मिळतच नाही. त्यासाठी खूप जणांनी तुमच्या ब्लॉगला भेट देणं गरजेचं असतं :
- AdSense च्या जाहिरातीत गणित दाखवताना पेजव्ह्यूजची संख्या ५००० पासून दाखवले जात असल्याने कमीतकमी ५००० व्ह्यूज असावेत असा गैरसमज होतो.
- माझेच उदाहरण देतो. मार्च २०१८ मध्ये सुरू केलेल्या ह्या ब्लॉगवर लेख लिहिताना माझे एकूण १७,००० व्ह्यूज आहेत.
- सरासरी ४७० असा हिशोब जरी केलात तरी प्रत्यक्षात महिन्याला मात्र इतके व्ह्यूज मार्च २०२० च्या लॉकडाऊन आधी कधीच नव्हते.
- १७०००० पैकी केवळ ५००० व्ह्यूज हे लॉकडाऊनच्या आधीचे तर २०२० च्या लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांत ८००० व्ह्यूज मिळाले होते.
- १ जूनला अनलॉक झाल्यानंतर मुख्य व्यवसायात जास्त लक्ष द्यावे लागले. त्यामुळे जून २०२० पासून महत्त्वाच्या नि आर्थिक कमाई करून देणाऱ्या प्रकल्पाला लक्ष देणे महत्त्वाचे असल्याने जून २०२० पासून मे २०२१ मध्ये हा लेख लिहीपर्यंत मी एकही नवीन लेख प्रकाशित केला नाही.
खूप लेखन केलं तरीही AdSense Approval मिळतच नाही.
- फक्त खूप फक्त लिखाण करून उपयोग नाही. लेखनाच्या मांडणीला ब्लॉगमध्ये फार महत्त्व आहे.
- लिहिताना गुगलने दिलेल्या Major heading, Heading, Sub Heading, Minor heading याला फार महत्त्व आहे.
- शक्य तिथे क्रमांक किंवा चिन्हे द्या.
- साधा लेख असेल तर किमान महत्त्वाची किंवा सुंदर वाक्ये बोल्ड किंवा अधोरेखित करा. महत्त्वाच्या सूचना रंगीत करा.
- शीर्षक , उपशीर्षक आणि मुख्य लेख यांतील शब्दाचा आकार यांमध्ये फरक असू द्या.
- लेखाच्या अगदी सुरूवातीला लेख कशावर आहे हे लिहायला विसरू नका. नाहीतर वाचक पुढे जातच नाहीत. इंटरनेटचा वाचक फार चंचल असतो. तो लगेच दुसरा पर्याय शोधतो नि हरवतो. पुस्तक वाचणारा हातातले पुस्तक नि विषय सोडत नाही.
- नंतर पुन्हा तुमच्या ब्लॉगचे नाव लिहा. ब्लॉगच्या नावाला त्याची लिंक जोडलेली असू द्या.
- किमान एकतरी चित्र लेखात असू द्या. पुस्तकाला मुखपृष्ठ असतं तसे लेखाला मुखचित्र आहे असा दृष्टीकोन असू द्या.
- चित्र शक्यतो कमी मेमरीचं असू द्या. स्वत:कडे असलेले चित्र आधी Webp मध्ये चित्र रूपांतरित करा. jpeg ते Webp रूपांतर इतर अनेक संकेतस्थळांवर मोफत करून मिळते. संकेतस्थळावर मिळवलेले चित्र कॉपीराईटचे चिन्ह नसलेले असावे.
- चित्र निवडून 'Alternative Text' देणे फार महत्त्वाचे आहे. शिवाय चित्राला शीर्षकसुद्धा नक्की द्या.
- अनेकदा माहिती शोधणारा गुगलच्या इमेजमध्ये जाऊन त्याला हवी असलेली माहिती शोधत असतो. त्याला जर तुमचे चित्र दिसले तर तो त्या मार्गाने तुमच्या ब्लॉगपर्यंत पोहचू शकतो.
फार जुना ब्लॉग आहे तरी AdSense Approval मिळतच नाही.
दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगलं नि जास्त लिहितोय तरीही AdSense Approval मिळतच नाही.
- वर दिलेल्या सूचनांचे पालन करत लिखाण मांडले तरीही काही मुख्य लिखाणाव्यतिरिक्त काही सुधारणा तुम्हाला कराव्याच लागतील.
- शीर्षक फार लांबलचक नसावे याची काळजी घ्या. लोकांनी आपला लेख लिहावा म्हणून शीर्षकात महत्त्वाचे शब्द आणण्याचे प्रयत्न आपल्याकडून होत असतो. पण त्याचा अंशतः परिणाम अॅप्रूव्हल मिळवण्यावर होत असतो.
- तुमची कोणतीही पोस्ट अगदी पहिल्यांदा सेव्ह करताना उजवीकडे लक्ष द्या. Permalink मध्ये जाऊन Custom permalink मध्ये जाऊन आपल्याला हवे असे शब्द आपल्या पोस्टच्या लिंकमध्ये असले पाहिजेत.
- काही वाचकांना हे समजले नसेल म्हणून त्यांनी त्यांची एखादी पोस्ट नवीन विंडोमध्ये ओपन करून वरची आडवी ओळ पहावी. तिथे समजेल अशा शब्दांत लिंक असावी यासाठी Permalink मध्ये सांगितलेली कृती करावी.
- पोस्ट बनवताना अगदी सुरुवातीला ही कृती करावी.
- मला ही सूचना समजली तेंव्हा प्रकाशित केलेल्या सर्व पोस्टमधील माहिती काढून पुन्हा नव्या पोस्टमध्ये आणावी लागली. त्यामुळे सर्व लेखांना किती जणांनी भेट दिली हा वेगवेगळा दिसणारा आकडा खऱ्या आकड्यापेक्षा कमी आहे.
- याचा आपल्या ब्लॉगला भेट देणाऱ्या अंकावर परिणाम होत नाही. पण माझ्या नावाने सर्च केल्यानंतर जास्त वाचल्या गेलेल्या नि जुन्या 'आई' या विषयावरील खरीखरी गोष्ट पहिल्या पानावर दिसणं बंद झालं.
- गुगलमध्ये काय शोधले की तुमचा ब्लॉग दिसण्याची शक्यता वाढते हे ठरवून ते Search Description मध्ये नेमक्या शब्दांत जरूर लिहा.
भरपूर पोस्ट लिहिल्या आहेत तरीही AdSense Approval मिळतच नाही.
- ब्लॉग कसा लिहावा ? अॅप्रूव्हल कसं मिळवावं ? कीवर्ड्स कसे मिळवावेत ? बॅकलिंक कशी मिळवावी या ? ब्लॉगद्वारे पैसे कसे मिळवावेत ? या आणि अशा फक्त ब्लॉगविषयक मोजक्या पोस्ट लिहून ब्लॉगला AdSense Approval मिळालेले ब्लॉग तुम्हाला सहज मिळतील.
- कारण हा एकच विषय मांडताना वापरल्या जाणाऱ्या शब्दांची गर्दी त्या ब्लॉगमध्ये आपोआपच होते. ही निवडक शब्दांची गर्दी होणे महत्त्वाचे आहे. अगदी प्रमाणाबाहेर होणारी गर्दीसुद्धा Approval साठी मारक ठरते हे लक्षात असू द्या.
- फक्त भरपूर पोस्ट असून उपयोगाचे नाही. एका पोस्टमध्ये कमीतकमी १००० शब्द असू द्या.
- समजा एखाद्या पुस्तकाचे वर्णन तुम्हाला केवळ २५० शब्दात करता आले. तर त्याच प्रकारातील ४ पुस्तकांची माहिती पोस्टमध्ये असावी.
- व्यक्ती लेखक आहेत की नाहीत हा मुद्दा वेगळा.
- कारण उत्तम लेखक असणे आणि उत्तम ब्लॉगर असणे या भिन्न गोष्टी आहेत.
- गुगलद्वारे मिळणारा सर्वोत्कृष्ट लेखक सर्वात जास्त पेजव्ह्यूज मिळालेला लेख असतो.
- सर्वोत्कृष्ट लेखकांची नावे असे गुगलमध्ये शोधल्यानंतर सर्वोत्कृष्ट ब्लॉगरने जर त्याच्या ब्लॉगमध्ये लिहिली तर सर्वांत पहिली सापडतील.
प्रकाशित केलेल्या लेखाला व्ह्यूज तर मिळतात पण ....
- ब्लॉगमध्ये विषयाशी संबंधित इतर प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या पोस्टमध्ये असतील तर त्याची लिंक मात्र त्याच लेखात असू द्या.
- सर्व दहा लेख एकमेकांत गुंफलेले, ब्लॉगिंगच्या भाषेत लिंक केलेले असावेत त्यामुळे त्याच्या ब्लॉगमधल्या विविध पोस्ट वाचण्यात वाचक व्यग्र होत जातो.
- जर तुम्ही नेहमी विविध विषयांवर ( माझ्याप्रमाणे ) लिहित असाल तर तूमच्या लेखात एखादी लिंक अगदी शेवटी असो की मध्येच एखाद्या परिच्छेदानंतर ते ब्लॉगवर अवलंबून आहे.
- शिवाय तुमच्या मूळ ब्लॉगची लिंक अगदी सुरूवतीला शीर्षकात असावी जी तुम्ह्याही वाचत असलेल्या लेखात सुद्धा आहे.
- पोस्ट लिहीत असताना वर 'Insert or edit Link' चे बटण पाहा. त्या विषयावर आधारित असलेच पाहिजे असे नाही. एकदा लिंक केल्यानंतर गरज भासल्यास ती लिंक तपासून पहा.
- पण लिंक असलेली कोणतीही पोस्ट डीलिट करू नका. माहिती डिलीट करायचीच असेल तर ती माहिती जोडल्या गेलेल्या शब्दातून ती सेटिंगसुद्धा अवश्य बदला. लिंक तुटू देऊ नका.
नवीन पोस्ट वाचल्या जातात पण जुन्या नाहीत.
- इतर विषयांवरील लेखांसाठी 'Labels' हा पर्याय फार उत्तम ठरेल.
- त्यासाठी तुम्ही लिहित असलेल्या लेखातील महत्त्वाचे शब्द 'Labels' खाली लिहून ठेवा.
- वाचकाला रस असलेल्या एखाद्या विषयावर तो त्या शब्दाद्वारे त्या लेखापर्यंत पोहचू शकतो.
- पण त्या शब्दाशी संबंधित लिखाण त्यावर जास्त असावे. नाहीतर वाचक तुमचा हात त्या क्षणी सोडू शकतो.
सर्व लेखांना बऱ्याच वर्षांपासून बरेच पेजव्ह्यूज मिळालेत तरीही ....
- वरीलप्रमाणे सर्व पोस्ट आहेत याची खात्री करा. मी स्वत: सर्व पोस्ट पुन्हा बनवल्या आहेत.
- सर्व पोस्ट मिळून जो ब्लॉग तुम्ही पाहता तिथे Disclaimer, About Me, Privacy Policy, About us हे पेज बनवा.
- उदाहरण म्हणून हाच ब्लॉग नीट पहा. हे चार फार महत्त्वाचे आहेत हे मी कोर्स करताना शिकलोय. शिवाय माझा ब्लॉग आणि इतरांचा ब्लॉग यात मला हाच फरक जाणवला.
- वरील मुद्दा महत्त्वाचा आहेच याबद्दल मी साशंक आहे. पण इतके प्रयत्न करत असाल तर हेही करा. फार वेळ लागत नाही.
- तुमच्या विविध लेखांचे वर्गीकरण करा. याची सोय ब्लॉगरवर आहेच. विनोदी, लेख, कथा, पुस्तक असे वेगवेगळे वर्गीकरण माझ्या मुख्य पानावर आढळेल.
- सेटिंगमध्ये जाऊन ब्लॉगचे नाव , description तपासून घ्या. ब्लॉगचे नाव , description तुमच्या मूळ पोस्टमध्ये सुद्धा कशा येतील यावर डोकं लाऊन त्याप्रमाणे description लिहा. ब्लॉगच्या नावात सुद्धा सहजसोपा आणि फार ओळखीचा शब्द असल्यास उत्तम.
- गुगलच्या pagespeed insights वर तुमच्या ब्लॉगची लिंक तपासून वेग तपासून पहा. मोबाईलवर तुमच्या पोस्ट दिसण्यासाठी वेळ लागतोय का ? ते तपासून पहा. वेळ लागत असेल तर फार जास्त मेमरी साईज असलेली छायाचित्रे काढून त्यांची साईज कमी करा. वेग वाढेल. हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही. पण फरक पडतो.
- तुमच्या लेखांची लिंक एकमेकांच्या ब्लॉगमध्ये जोडता येईल का ते पहा. म्हणजे माझ्या ब्लॉगमधील विषयाला जोडलेला तुमच्या ब्लॉगमधील त्याच विषयाची लिंक माझ्या ब्लॉगवर आणि माझ्या पोस्टची लिंक तुमच्या ब्लॉगवर असू द्या. जेणेकरून एकमेकांना मदत होत राहील.
- समाजमाध्यमे, फेसबुक, व्हॉट्सअॅप, क्वोरा सोबतीला आहेतच.
वाचकांना अभिप्राय द्यायला भीती किंवा संकोच किंवा आळस वाटतो.
- वाचकांचा अभिप्राय देण्याची परवानगी असू द्या.
- अभिप्रायला किमान एकदा प्रतिसाद द्या. पुढील लेखनात सुधारणा तर होतेच, शिवाय प्रतिसाद दिलेल्या लेखातसुद्धा एखादा राहून गेलेला मुद्दा जोडण्याची संधी मिळते.
- ज्या विषयावर लिहून अभिप्राय देणे शक्य नाही तिथे स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम.
विश्वासार्हता
विश्वास वाटेल असं मी लिहतो असं तुम्हाला आता जाणवतंय का ? तर याचे उत्तर हो असेल याची मला खात्री आहे.
खरंखरं लिहिताना काहीच वाटत नाही.
पण तरीही मी माझ्या पोस्ट खाली माझा परिचय देतो. नव्हे तर वैयक्तिक, शैक्षणिक , व्यावसायिक नि छंदांविषयी मी मुद्दाम वेगळ्या पोस्ट लिहून ठेवल्या आहेत.
इतर लेख :
Very good information Sir
ReplyDeletehttp://www.pradnyan.com/
धन्यवाद. तुमची वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न केला पण This page is not working असे दिसले.
Deleteछान आणि परिपूर्ण माहिती दिली आहे, नवशिके आणि आदवाचणीत असलेले ब्लॉगर यांना मार्गदर्शक आहे. धन्यवाद.
ReplyDeleteThank you so much Sir,..
ReplyDeletenitinvaradkar.blogspot.com
Thanks for sharing deep information
ReplyDelete