Trekking Group साठी नाव शोधताय? यातली किंवा याप्रकारे तुम्ही ग्रुपला नाव देऊ शकता
Marathi Blog - मनात आलं म्हणून
Trekking Group साठी नावे
गेली १८ वर्षे Trek करतोय. आधी मित्रांसोबत अनेक Trek केले. चांगल्या ट्रेकमुळे नि चांगल्या मित्रांमुळे ट्रेकची मजा वाढू लागली. पण मुळात आधी इतिहासाची आवड होती. मनात अनेक प्रश्न होते, त्यांची उत्तरं गड-किल्ले बघून मिळाली. पण ट्रेक करताना बर्याचदा अशी माणसं सोबत असतात ज्यांचा या विषयावर बर्यापैकी अनुभव नि अभ्यास असतो. या गुरूसमान व्यक्तींनी / मित्रांनी एकंदर Trekkingचा अनुभव समृद्ध केला आहे.
मी आधी माझ्या मित्रांसोबत Trek करत असे. त्या ग्रूपचं नाव काय असावं याबद्दल गेलो १८ वर्षे चर्चा सुरू आहे. त्याची नोंदणी व्हावी असं वाटतं. वेळेअभावी नि समन्वयाअभावी ते शक्य झालं नाही. पण व्हाट्स अॅप वर तरी किमान त्याचं नाव आहे...... 'सहयपुत्र".
आमचे सर श्री. राजेश परब यांनी किमान ३५० Trek सह्याद्रीत केले आहेत. शिवाय इतर अनेकांनी एकेकाने १०० ते १५० किल्ले सर केले असावेत. ही संख्या वाढेल यात शंकाच नाही.
मी स्वतः Trekshitiz, Trekloers ग्रुपसोबत Trek केले आहेत. शिखरवेध, शैलभ्रमर, 'Get Out Ventures' ही मला नीट माहीत असलेली नि सध्या लिहताना लक्षात आलेली नावं.
वैयक्तिकरित्या मला Trekking ग्रुपसाठी अनेक नावे सुचली होती, आजही सुचत असतात. काही विसरलोयसुद्धा
१. गवसणी : आकाशाला गवसणी घालणे (म्हणजे आवाक्याबाहेरची गोष्ट करणे ) यातला गवसणी हा शब्द मला महत्त्वाचा वाटतो. गवस आडनाव असलेल्या व्यक्तिला त्याच्या ट्रॅव्हल्स कंपनीसाठी मी हाच शब्द सुचवला होता.
मला फार हसूही आलं होतं.
२. घुमजाव : मी स्वत: व्यावसायिक Trekking ग्रुप करायच्या विचारात होतो. पण व्यवसायाला मर्यादा नको म्हणून त्यात इतर प्रवासही असावेत असा आधीच विचार केलेला होता. 'फिरून या' या अर्थाचा हिंदी शब्द 'घुमजाव' मला आवडला. पण प्रत्यक्ष व्यवहार किंवा प्रवास करताना या शब्दाचा वापर टोमणे मारण्यासाठी होऊ शकतो. ठरवलेला प्रवास होईलच असं नाही. त्यामुळे प्रवासी 'तुम्ही नावाप्रमाणे घुमजाव केलं असं म्हणू शकतील.
३ . फिरकी : पतंग उडवताना वापरली जाणारी फिरकी. मी मुलींच्या ग्रुपला हे नाव ठेवण्याचा सल्ला देईन.
४ . ट्रेकला चलो रे : रविंद्रनाथ टागोर यांच्या 'एकला चलो रे' गाण्यावरून मला हे सुचलं. नीट आठवत नाही पण कदाचित एखाद्या वर्तमानपत्रात हे तुम्ही वाचलं असावं.
५ . ट्रेकिंगिरी: esahity.com या वेबसाइटवर 'दुर्ग दुर्गट भारी' हे सदर आहे. माझं लिखाण त्या साच्यात बसत नव्हतं. म्हणून 'ट्रेकिंगिरी' हे सदर सुरू करून मी ४ पुस्तके प्रकाशित केली जी वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध आहेत.
६ . ट्रेकडी: Trekking हे फक्त गड-किल्ल्यांवर नसतं आणि असूही नये. एखादं दृश्य बघण्यासाठी, कॅमेरामध्ये टिपण्यासाठी कोणत्याही टेकडीवर जाण्याचा बेतही होऊ शकतो. टेकडी या शब्दावरून 'ट्रेकडी' हा शब्द कसा वाटतो ?
७. आम्ही गडकरी: गडकरी हे आडनाव एकेकाळी पद होतं. सर्वांना एकत्र आणून आम्ही गडकरी या नावात जबाबदारी दडलेली आहे. त्यामुळे हे नाव जबाबदार ग्रुपने ठेवावे.
८. गडूळ ग्रूप: चक्रम हायकर्स नावाचा एक ग्रुप मुंबईमध्ये आहे. 'चक्रम' या शब्दाचा सरळसरळ दिसणारा अर्थ बाजूला सारून त्याचा संस्कृत Fullform त्यांच्या वेबसाइटवर पहा ही विनंती.
९ . विहंग : विहंग म्हणजे पक्षी, स्वच्छंद फिरण्याचा आनंद घेणारा तुमचा ग्रुप आहे का ? मग हे नाव तुमच्यासाठी
१०. गडीमाणूस : गड-किल्ले -दुर्ग यांसाठी निस्वार्थीपणे काम-श्रमदान करणार्या ग्रुपसाथी मला हे नाव योग्य वाटतं. कृपया नकारार्थी विचाराने याकडे पाहू नये.
Trekking ग्रुपला नाव कोणतेही द्या आणि दिलेच पाहिजे असंही नाही. पण जबाबदारीने वागणं महत्त्वाचं. महापुरुषाच्या नावाला जोडून ग्रुपचे नाव दिल्यास आपलं प्रत्येक कृत्य हे त्या महापुरुषाचे नाव उंचवणारं किंवा अपमान करणारं ठरू शकतं.
ग्रुपसाठी ठरवलेल्या नावाचा लोगो, पोस्टर बनवल्यास अनेक फायदे होतात. लोगो असलेलं टी-शर्ट घालून कोणतेही चुकीचं कृत्य इतर ठिकाणी करू नये. अन्यथा पूर्ण ग्रुपचे नाव खराब होते. गड-किल्ले-दुर्ग या विषयांचा मान न ठेवणार्यांना, व्यसन करणार्यांना टी-शर्ट, लोगो असललेल्या वस्तू ( टोपी, बॅग) देऊ नये.
ग्रुपचे नाव जंगलात असताना ओरडू नये. पक्षांना माणसाची भाषा कळत नाही. त्यांना गरजही नाही. पण तुमच्या आवाजाने त्यांच्या पिल्लांना त्रास होतो. आकाराने लहान असलेल्या पक्षांच्या लहान पिल्लांच्या लहान हृदयावर दहा माणसांच्या एकत्र ओरडण्याने परिणाम होत असतो.
जाता जाता, ग्रुपचं नाव ठरवताना कोणीही किंवा ग्रुपने पाळण्यात बसण्याची आवशक्यता नाही ;-)

अधिक वाचा
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
१० नावे Trekking Group साठी
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 20, 2020
Rating:
No comments: