साहित्यिक वगैरे स्वतःला म्हणावं इतका काही मी मोठा नाही. कारण अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
माझ्या लेखनविषयी
सज्जनगड येथे परिसंवादात सहभाग ( मी डावीकडून दूसरा) |
मी पहिले पाऊल पुस्तक कसं लिहिलं आणि कसं प्रकाशित केलं याबद्दल लिहिलं आहे. जाहीरपणे स्वतःला लेखक म्हणण्याची ही पहिलीच वेळ होती. पण पुस्तक प्रकाशन होण्याआधी मला ज्येष्ठांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी लिहून झाल्यानंतर पुस्तक प्रकाशनपूर्वी काही लेख लिहिले.
लोकसत्ताच्या Trek It सदरात मी सर्वप्रथम लेख प्रकाशित केला. तो भैरवगड किल्ल्याबद्दल होता. त्यानंतर मी कळसूबाई, वैराटगड, आजोबागड, कोहोजगड या किल्ल्यांवरील Trek वर्णन लिहिले. त्याशिवाय लडाखमध्ये केलेल्या सायकलसफरवर आधारित एक लेख लिहिला. किल्ल्यांची नावे वेगळ्या पद्धतीने सुलेखनकलेत कशी लिहता येईल यावरही एक वेगळ्या ढंगाचा लेख लिहिला. दुर्गसखाच्या ई-अंकात रोहिडा किल्ल्याविषयी तसेच सकाळ- साप्ताहिकमध्ये 'सोंडाई' किल्ल्यावर रात्री केलेल्या Trekचे वर्णन लिहिले. 'किल्ला' या नियतकालिकेत ' माझा गडगडाट' व जम्मूमधील किल्ल्यांविषयी लिहिले. हे दोन्ही लेख 'मनात आलं आलं म्हणून या Marathi Blog मध्ये उपलब्ध आहेत.
मनात आलं म्हणून या Marathi Blogचे सुरूवातीचे काही लेख मी त्याच नावाने esahity.com वर प्रकाशित केले. याच संकेतस्थळावर मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ ही चार पुस्तके मोफत उपलब्ध आहेत.
सज्जनगड, सातारा येथे किल्लेविषयक लिखाण व ई-साहित्य या विषयावर परिसंवादात माझी मुलाखत झाली नि सत्कार झाला. तो माझ्यासाठी विशेष क्षण होता. बाबासाहेब पुरंदरे यांना मी माझे पहिले पाऊल हे पुस्तक तिथे भेट केले नि त्यांचा आशीर्वाद घेतला.
चौथा सिंह नावाची एकांकिका लिहून 'अमर हिंद मंडळ, दादर येथे आम्ही ती सादर केली होती. कलाकार मिळेना त्यामुळे त्यात अभिनय करण्याची संधीसुद्धा मिळाली. त्यानंतर 'नाव काढलं पोराने' ही व्यवसाय निवड नि वस्तूस्थिती या विषयावर व 'भिंतीलाही टॅटू असतात ही किल्लेविषयक एकांकिका लिहिली.
झी - मराठीच दिवाळी विशेषांकमध्ये ' ऊब मायेची' या लेखासाठी उत्तेजनार्थ नामांकन मिळाले. ईशान्य वार्ता, विश्वभान आणि इतर अनेक अंकात लेख प्रकाशित झाले.
पहिले पाऊल ( संवेदना प्रकाशन) या पुस्तकाने बरीच ओळख नि प्रसिद्धी दिली. २०१६ साली मी माझ्या लडाख येथील सायकल परिक्रमा व बुलेटप्रवास अनुभव या विषयावर 'सफरछंद ' ( ग्रंथाली प्रकाशन) हे पुस्तक लिहिले. ते ई-बुक स्वरूपात अद्याप उपलब्ध नाही.
नुकतेच २९ मे , एव्हरेस्टदिनचे औचित्य साधून 'पहिले पाऊल'चा इंग्रजी अनुवाद मी अॅमेझॉन किंडलवर प्रकाशित केला. त्यासोबत पहिले पाऊल व सफरछंद या दोन्ही पुस्तकांचे इ पुस्तक अॅमेझॉन किंडलवर उपलब्ध केले.
पहिले पाऊल या पुस्तकासाठी ' रामदीप' या वृत्तपत्रातर्फे पुरस्कार मिळाला.
रामदीप वृत्तपत्रातर्फे सत्कार स्वीकारताना |
बाकी सर्व लिखाण मनात आलं म्हणून या Marathi Blog मध्ये उपलब्ध आहे.
वाचा. वाचत रहा. लिहा. पुढील पिढीला मार्गदर्शन करा.
-खूप खूप शुभेच्छा !!
माझ्याविषयी अधिक माहिती
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
थोडं माझ्याविषयी- साहित्यिक
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 11, 2020
Rating:
No comments: