हिमालयात कोणता ट्रेक केलाच पाहिजे? उत्तर : युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया (YHAI) सोबत 'THE SAR PASS TREK' : पहिले पाऊल 
Marathi Blog - मनात आलं म्हणून
पहिले पाऊल
![]()  | 
| पहिले पाऊल -पंकज घारे  | 
याच तारखेला १९५३ साली जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर मानवाने ( सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्सिंग)  'पहिले पाऊल' ठेवले होते.
याचेच निमित्त साधून मी माझे पहिले पाउल हे पुस्तक ई-बुक स्वरूपात नव्या ढंगात अॅॅमेझोन किंडलवर प्रकाशित करत आहे. 
YHAI सोबत केलेल्या 'सर पास' येथील गिर्यारोहणाचा अनुभव मी 'पहिले पाऊल या पुस्तकात लिहिला नि 29 मे या दिवशी bookganga.com या वेबसाइटवर ई-बुक माध्यमात जास्त छायाचित्रांसह प्रकाशित केले. पुस्तकाची Link खाली दिली आहे.'युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया' (YHAI) अनेक साहसी प्रवासांचा बेत आखत असते. त्यापैकी सर्वात लोकप्रिय प्रवास म्हणजे 'सरपास'.
दरवर्षी मे महिन्यात होणार्या या प्रवासाची जाहिरात YHAI च्या वेबसाइटवर डिसेंबर-जानेवारी दरम्यान निघते. आधी YHAI चे सभासद होऊन नंतर ऑनलाइन नोंदणी करून प्रवासासाठी नाव देताना उपलब्ध तारीख मिळवावी लागते व फी भरावी लागते. सभासद नोंदणी व मुख्य प्रवासाची फी ( माझ्या मते) सर्वांत माफक आहे. इतर प्रवास म्हणजे तुमचे घर ते Basecamp हा प्रवास स्वखर्चाने वेगळा करावा लागतो.
YHAIच्या वेबसाइटवर Trek करताना सोबत नेण्याच्या वस्तू, अत्यावश्यक कागदपत्रे यांची माहिती मिळेल.
खाली दिलेल्या नकाशात प्रवासाचे टप्पे दिले आहेत. हिमालयातील' सर पास' या १३,८०० फूट उंचीवर असलेल्या खिंडीपर्यंत पोहचून पुन्हा सुरक्षित प्रवास करताना निसर्गाच्या शाळेत YHAI ने खूप काही शिकवले. त्यांची शिस्त, जेवणाची व्यवस्था, राहण्यासाठी तंबू, मुख्य प्रवासाआधी प्रशिक्षण, सराव, सर्वांनी एकत्र होण्यासाठी करायचे कार्यक्रम, वेळेचं काटेकोरपणे होणारं पालन, मुख्य प्रवासाआधी आणि प्रत्येक टप्प्याआधी होणारं मार्गदर्शन, वाटेत मिळणारं प्रोत्साहन, छोट्याछोट्या महत्त्वाच्या टिप्स आणि कायमची होणारी मैत्री या युथ हॉस्टेल सोबत केलेल्या प्रवासाच्या जमेच्या बाजू आहेत.
या पुस्तकाने मला अनेक गिरिमित्र, दुर्गमित्र, निसर्गमित्र दिले. गिरिमित्र संमेलन, दुर्गसाहित्य संमेलन, साहित्य संमेलन, आजही येणाऱ्या पत्रांनी आणि दूरध्वनीद्वारे मिळालेल्या प्रोत्साहनाने भारावून आता 'पहिले पाऊल' ई-पुस्तक म्हणून सादर करतोय. हे विनोदी प्रवासवर्णन वाचकांना नक्की आवडेल.
ई-पुस्तक किंमत : ९९/-( अॅमेझॉन किंडलवर उपलब्ध) 
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
हिमालयात YHAI सोबत THE SAR PASS TREK
 
        Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
        on 
        
May 24, 2020
 
        Rating: 
      
 
        Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
        on 
        
May 24, 2020
 
        Rating: 


No comments: