थोडंसं माझ्याविषयी- शैक्षणिक

माझ्या पालकांचा सगळ्यात मोठा नि सर्वोत्तम निर्णय म्हणजे त्यांनी निवडलेली शाळा अमरकोर विद्यालय, भांडुप; वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इंस्टीट्यूट, माटुंगा आणि सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंधेरी

Marathi Blog - मनात आलं म्हणून

माझे शिक्षण 

शाळेत जाण्याआधी मी एका छोट्या क्लासला जायचो. तिथे काय शिकवायचे हे नाही आठवत. पण अ, आ, इ सोबत त्या बाई इतर मुलांना A, B, C, D शिकवत  तेंव्हा मीसुद्धा ती गिरवायचो इतकं आठवतंय. कोणाच्या डब्यात काय आहे हे त्या तपासायच्या नि चेहर्‍यावर कौतुक करायच्या . त्यामुळे 'पारले-जी' बिस्किट खूप चांगलं असतं हे मला माहीत झालं.

marathi blog on my education
शिक्षण ज्ञानासोबत आनंद देते 

पण मला सर्वांत जास्त कौतुक माझ्या शाळेचं आहे. अमरकोर विद्यालय, भांडुपमध्ये मी लहानाचा मोठा झालो. नाहीतर मोठा झालोच नसतो. मी मोठा शिशू ते दहावीपर्यंत अमरकोर विद्यालयात शिकलो. पण फक्त अभ्यास करण्यामागे आमची शाळा नव्हती. तेंव्हा एखादी शाळा मुलांच्या इतर गुणांना प्रोत्साहन देत होत्या का ते माहीत नाही. पण आमच्या शाळेत खरोखरच इतर गुणांना प्रोत्साहन मिळायचं, शाळेने मला दिलेल्या कलागुणांबद्दल मी नंतर सांगेन. आधी शाळेने लावलेल्या अभ्यासाच्या आवडीबद्दल बोलू.

शाळेतल्या शिक्षकांच्या शिक्षणामुळे चौथी नि सातवी इयत्तेत मला शिष्यवृत्ती मिळाली होती. हे काहीच नाही. आमच्या शाळेचे विद्यार्थी मुंबईत पहिले आले होते. शाळा डोंगराला एकदम चिकटून आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. मारुती म्हात्रे यांचा राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सत्कार केला होता. माझ्या शाळेत फार  आधीपासून वाचनालय, ग्रंथालय, संगणक कक्ष ( Computer Room), प्रयोगशाळा आहे.   शाळेतल्या अनेक शिक्षकांशी जोडलेल्या माझ्या अनेक आठवणी आहेत. मी शिक्षकांचा इतका लाडका नव्हतो कारण मी फार उलट उत्तर द्यायचो. पण तरीही त्यांच्याबद्दल मनात एक मोठी जागा आहे. शाळेनंतर शिक्षकांसाठी प्रेमाची जागा नंतर कॉलेजमधले शिक्षक घेत नाहीत असं मला वाटतं. अर्थशास्त्र, जीवशास्त्र वगळता माझा अभ्यास चांगला होता. सध्या सर्वच विषयात आजही अभ्यास सुरू आहे कारण त्या विषयातली आवड नि भूक अजूनही टिकून आहे. शाळेत जोडले गेलेले मित्र आजही माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात स्पर्धा असायची.  मस्ती असायची. रूसवेफुगवे, मारामार्‍या, तक्रारी असायच्या. आज सगळे चांगले मित्रमैत्रिणी आहेत. काहीजण या जगात नाहीत. नववी- दहावीला असताना मी जीवन क्लासमध्ये खाजगी शिकवणीसाठी जात असे. त्यामुळे मी भांडुपमधल्या इतर शाळा नि तिथल्या मित्रांशी जोडला गेलो.
सध्या शाळेत बरेच बदल झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील बालसंभाजीची भूमिका चोख बजावणारा बालकलाकार दिवेश मेदगे हा आमच्या शाळेचा विद्यार्थी. शाळेशी विद्यार्थ्यांचं नातं इतकं घट्ट आहे की आजही विशेष पाहुण्यांप्रमाणे माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात येतं.  ही जबाबदारी माझ्या वाट्याला आली तेंव्हा माझ्या भाषणातील एका वाक्याचं सर्वांनी कौतुक केलं की शाळा सोडल्याचा दाखला मिळतो पण शाळेने सोडल्याचा दाखला दिल्याचं उदाहरण नाही. 

शाळेत जाण्याआधी मी एका छोट्या क्लासला जायचो. तिथे काय शिकवायचे हे नाही आठवत. पण अ, आ, इ सोबत त्या बाई इतर मुलांना A, B, C, D शिकवत तेंव्हा मीसुद्धा ती गिरवायचो इतकं आठवतंय. कोणाच्या डब्यात काय आहे हे त्या तपासायच्या नि चेहर्‍यावर कौतुक करायच्या . त्यामुळे 'Parle-G' बिस्किट खूप चांगलं असतं हे मला माहीत झालं.

अमर कोर विद्यालय 
पण मला सर्वांत जास्त कौतुक माझ्या शाळेचं आहे. अमरकोर विद्यालय, भांडुपमध्ये मी लहानाचा मोठा झालो. नाहीतर मोठा झालोच नसतो. मी मोठा शिशू ते दहावीपर्यंत अमरकोर विद्यालयात शिकलो. पण फक्त अभ्यास करण्यामागे आमची शाळा नव्हती. तेंव्हा एखादी शाळा मुलांच्या इतर गुणांना प्रोत्साहन देत होत्या का ते माहीत नाही. पण आमच्या शाळेत खरोखरच इतर गुणांना प्रोत्साहन मिळायचं, शाळेने मला दिलेल्या कलागुणांबद्दल मी नंतर सांगेन. आधी शाळेने लावलेल्या अभ्यासाच्या आवडीबद्दल बोलू.

शाळेतल्या शिक्षकांच्या शिक्षणामुळे चौथी नि सातवी इयत्तेत मला शिष्यवृत्ती मिळाली होती. हे काहीच नाही. आमच्या शाळेचे विद्यार्थी मुंबईत पहिले आले होते. शाळा डोंगराला एकदम चिकटून आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. मारुती म्हात्रे यांचा राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सत्कार केला होता. माझ्या शाळेत फार आधीपासून वाचनालय, ग्रंथालय, संगणक कक्ष ( Computer Room), प्रयोगशाळा आहे. शाळेतल्या अनेक शिक्षकांशी जोडलेल्या माझ्या अनेक आठवणी आहेत. मी शिक्षकांचा इतका लाडका नव्हतो कारण मी फार उलट उत्तर द्यायचो. पण तरीही त्यांच्याबद्दल मनात एक मोठी जागा आहे. शाळेनंतर शिक्षकांसाठी प्रेमाची जागा नंतर कॉलेजमधले शिक्षक घेत नाहीत असं मला वाटतं. अर्थशास्त्र, जीवशास्त्र वगळता माझा अभ्यास चांगला होता. सध्या सर्वच विषयात आजही अभ्यास सुरू आहे कारण त्या विषयातली आवड नि भूक अजूनही टिकून आहे. शाळेत जोडले गेलेले मित्र आजही माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात स्पर्धा असायची. मस्ती असायची. रूसवेफुगवे, मारामार्‍या, तक्रारी असायच्या. आज सगळे चांगले मित्रमैत्रिणी आहेत. काहीजण या जगात नाहीत. नववी- दहावीला असताना मी जीवन क्लासमध्ये खाजगी शिकवणीसाठी जात असे. त्यामुळे मी भांडुपमधल्या इतर शाळा नि तिथल्या मित्रांशी जोडला गेलो.
सध्या शाळेत बरेच बदल झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील बालसंभाजीची भूमिका चोख बजावणारा बालकलाकार दिवेश मेदगे हा आमच्या शाळेचा विद्यार्थी. शाळेशी विद्यार्थ्यांचं नातं इतकं घट्ट आहे की आजही विशेष पाहुण्यांप्रमाणे माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात येतं. ही जबाबदारी माझ्या वाट्याला आली तेंव्हा माझ्या भाषणातील एका वाक्याचं सर्वांनी कौतुक केलं की शाळा सोडल्याचा दाखला मिळतो पण शाळेने सोडल्याचा दाखला दिल्याचं उदाहरण नाही.

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलजिकल इंस्टीट्यूट (VJTI)
दहावीनंतर मी V. J. T. I. च्या यंत्र अभियांत्रिकीमध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी ( मेकॅनिकल) प्रवेश घेतला. कोणत्याही म्हणजे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक किंवा सिविल इंजिनिअरिंगमध्येही मी प्रवेश घेतला असता तरी मला तितकाच आनंद झाला असता. माझ्या कॉलेजची सगळ्यात परिणामकारक नि उपयोगी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तिथल्या प्रयोगशाळा. प्रत्यक्ष कृती ( Practical ) साठी कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजचे ऋणी राहतील. VJTI फार जुनं म्हणजे ब्रिटिशपूर्व काळापासून आहे. तिथल्या परिसरात आजही रणगाडे दिसतात.  इंजिनारिंग मधल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष नोकरीत नि व्यवसायात रोज उपयोग होत नाही. यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे. मी सखोल अभ्यास करून ते ज्ञान वापरले जाईल अशा ठिकाणी नोकरीला सुरूवातीलाच रुजू व्हायला हवं होतं. पण नोकरीसाठी मुलाखत देताना कॉलेजच्या नावाचा नि प्रमाणपत्राचा फायदा झाला. व्यवसायातसुद्धा मी इंजिनीअर आहे म्हणून मी बोललेल्या वक्तव्यावर ग्राहक विश्वास ठेवतो. V. J. T. I. ला असताना एक वर्ष मी ट्रेनिंगसाठी सिमेंस या कंपनीमध्ये एक वर्ष होतो. त्यावेळीही  मी खाजगी शिकवणीसाठी जात असे. 

सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (SPCE)

नोकरीला लागल्यानंतर नोकरी चालू असताना एक वर्षाने मी नाइट-कॉलेजमध्ये सरदार पटेल कॉलेजमध्ये मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी  प्रवेश घेतला. २००६ ते २०१० या चार वर्षांत मी पदवी शिक्षण पूर्ण केलं. पदविका शिक्षण घेतल्यानंतर पदवी शिक्षण हे तीन वर्षांचे असते. म्हणजे पदविका केलेल्या विद्यार्थ्याला पदवीच्या थेट दुसर्‍या वर्षात प्रवसेह मिळतो. ( पदवीच्या पहिल्या वर्षात पदविकाअभ्यासक्रम/ असतो. ) पदवी अभ्यासक्रमात एका सहामाहीमध्ये सहा विषय असतात. रात्रशाळेत वेळेच्या मर्यादेमुळे सहा ऐवजी चार वर्षे असतात. त्यामुळे रात्रशाळेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा काळ हा तीन ऐवजी चार वर्षे होता.
असो. सध्या मुंबईमध्ये रात्रशाळेत पदवी अभ्यासक्रम शिकवणारी संस्था नाही. मी प्रवेश घेतला तेच प्रवेश घेण्याचं शेवटचं वर्ष होतं. या कॉलेजमधल्या सोयीसुविधा वापरण्याची संधी वेळेअभावी मिळाली नाही. खूप कमी वेळ अभ्यासासाठी देता आला. इथे शिकल्याचा किंवा हे शिक्षण घेतल्याचा सर्वात मोठा फायदा हा झाला की दिवसाच्या २४ तासांचा जास्तीत जास्त वापर करण्याची मला सवय लागली. आराम करणं हेच माहीत नाही. त्यामुळे कॉलेजमधील शिक्षण झाल्यानंतर मी बराच वेळ वाचन- लिखाण नि इतर छंद जोपासण्यासाठी देताना सोयीचे जात आहे. 

शाळा, कॉलेजचं आयुष्यातील स्थान फार महत्वाचं आहे. तरीही सर्वांना सामायिक शिक्षण मिळत असताना विद्यार्थी ते किती ग्रहण करतो, आपल्या संस्थांशी जोडलेल्या नावांचा कृतीतून किती आदर राखतो हे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून असते. 

माझ्याविषयी अधिक माहिती 

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
थोडंसं माझ्याविषयी- शैक्षणिक थोडंसं माझ्याविषयी- शैक्षणिक Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 09, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.