मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून.……… हा मराठी ब्लॉग सुरू केला नि अनेक विषयांवर लिखाण करण्यासाठी लेखकाची डायरी तयार झाली.  

मनात आलं म्हणून 

फक्त गड किल्ले याविषयी लिखाण प्रकाशित केल्यानंतर इतर विषयांवर लिहिणं बाकी राहतंय असं वाटू लागलं. वह्या, डायर्‍या ऐन वेळेला सापडत नाहीत. शिवाय प्रवासाला गेल्यावर नेमकं कोणत्या वहीत काय लिहिलं ते लक्षात नाही राहत. अशा वेळी ब्लॉगचा पर्याय उत्तम वाटतोय. शिवाय काळानुसार स्वतःमध्ये लिखाण करण्याच्या पद्धतीने बदल होणं गरजेचं वाटलं. 

 लेखक, सर्वसामान्य नागरिक आणि खासगी आयुष्यात माणूस म्हणून अनेक अनुभव  येतात. सगळंच  काही सांगण्यासारखं विशेष नसतं . पण काही घटना मात्र आपल्याला विचार करायला लावतात. एक लेखक  म्हणून मला बरंच काही सांगायचं असतं . सर्वांशी बोलता येणं शक्य नाही. सर्वच विषयांवर एकएक करुन पुस्तक लिहणं शक्य नाही. काही विषयांवर  अधिकारवाणीने मत  मांडता येत नाही. ते चुकीचंही असू शकतं . पण किमान भुमिका तरी मांडता आली पाहिजे. याआधी वहीत लिहून प्रकाशित केलं. पण रोज लिहण्यासाठी वेळेचं गणित साधता येत नाही आणि लिहण्यास सुरूवात केली की बरंचसं विसरायलाही होतं. म्हणून हा प्रपंच.

काही चुकलं किंवा आवडलं तर नक्की कळवा. तुम्हाला हवा तो विषय सुचवा. जसं जमेल लिहत जाईन. पण फरफटत जाणार नाही याची काळजी घेइन. या नवीन उपक्रमाचं काहीच ध्येय नाही पण प्रवास महत्त्वाचा.
marathi travel food book political blog by pankaj ghare
मनात आलं म्हणून -मुखपृष्ठ 

मी वाचलेली पुस्तके, आयुष्यातले चांगले- वाईट अनुभव, विनोदी प्रसंग, माझी फजिती झालेले प्रसंग, समाजातल्या आणे समस्या नि माझे प्रवास अनुभव 'मनात आलं म्हणून' या ब्लॉगद्वारे मांडतोय. 

वाचकांनी जरूर प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा.

मराठी BLOG ला सुरूवात करताना 

Marathi Blog-Example of Start
सुरूवात महत्त्वाची 

सुरूवात कुठून करावी हे कळत नव्हतं. इतर लोक कशी सुरूवात करतात हे आधी जरा नीट पाहिलं.

सुरूवात करण्याध्ये इतकं वैविध्य असेल असं वाटलं नव्हतं. खुल्या जागेत काम करताना नारळ  फोडतात तर एखाद्या कक्षात शिरताना रिबीन कापतात. ही रिबीन कापण्याची पद्धत कुठून आली शोधावी लागेल. खूप हूशार माणसाने काढलेली ही सोपी पद्धत आहे. रिबीन किती सहज कापता येते. नारळ फोडताना मात्र तो प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. ( एकदाच आपटून फुटला नाही की कोणाला तरी हसू फुटतेच.)

प्रवासाला सुरू करताना सुद्धा नारळ फोडतात पण काहीजण पुढच्या चाकाखाली लिंबूची हत्या का करतात?  तसं  केल्याने अपघात होत नसतील तर (गाडीच्या पीयुसीसोबत) लिंबूबळी दिला की नाही हे पण तपासलं गेलं पाहिजे.
सुरू करण्याचे किती प्रकार?  

नवी नवरी घरात येताना माप ओलांडते. कुणी विजयी होऊन आलं की ओवाळलं जातं. 

पाटीवर लिहिलेला श्री आजही किती जण लिहत असतील? पण कुणीही अडाणी असो नावाच्या सुरूवातीला श्री लिहणं जास्त महत्त्वाचं. 

एकेकाळचं रामराम, आता गुड मॊर्निंग पर्यंत आलंय. फोनवर तर हेलो शिवाय नेटवर्कच मिळाल्याची खात्री होत नाही.

कबड्डी खेळणारे सीमारेषेला हात लावून मैदानाच्या पाया पडतात. तर सचिन-सेहवाग आकाशाकडे पाहत  क्रिकेटच्या मैदानात शिरायचे आणि चेंडू तिथेच आकाशात टोलवायचे.

Olympic मध्ये मशाल पेटवून तर सांस्कृतिक कार्यक्रमात दीपप्रज्ज्वलन 'श्रीगणेशा' होतो. गोट्या / भोवरा खेळताना मी कधी त्यांच्या पाया पडलो नाही. 

पण आता गडमार्गाच्या सुरूवातीला आणि नदी किंवा समुद्रात शिरताना पाण्याला स्पर्श करतोच.

शाळेत असताना १-२-३ म्हणत स्पर्धा सुरू होत असे.  परदेशाचं अनुकरण करत ते ३-२-१ असं नकळत झालं. क्षेपणास्त्र सुद्धा १० पासून ० पर्यत उलट अाकडे म्हणत सोडतात अाणि बातम्या सुरू होताना सेकंद कमी होताना दाखवतात.

सुरू केलंय तर थांबलंही पाहिजे म्हणून या विषयापुरता थांबतोय. खरंच, अाज दिवसाची सुरूवात डोकं खाजवत केली.

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
मनात आलं म्हणून मनात आलं म्हणून Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.