१२ कृती पुस्तक लिहिताना

 अनेक प्रश्न माझ्या मनात असायचे. तरीही मी पुस्तक कसं लिहिलं?

पुस्तक लिहताना 

marathi blog on writing a book
लेखन शक्यतो आधी पेनाने वहीत करावे 

मी इंजिनिअरिंग ( बी.ई. मेकॅनिकल)च्या शेवटच्या वर्षात असताना, मी आयुष्यात अजून स्वतःहून विशेष काही केलंच नाही म्हणून अस्वस्थ होतो. वाचन चालूच होतं त्यामुळे कोणताही विषय माझ्याकडे नसताना कमीतकमी निबंधाचं पुस्तक कॉलेजमधलं शिक्षण पूर्ण झाल्यावर कधीतरी लिहेन असं घरी जेवताना म्हणायचो. एकदाचा इंजीनिअर झालो. नाइट कॉलेज असल्याने कामावर निघून मी संध्याकाळी कॉलेजला जात असे. माझ्या सर्व सुट्ट्या ह्या परीक्षांसाठी खर्च होत होत्या. अशी चार वर्षे गेली. 

त्यामुळे ही चार वर्षे संपली नि ( डिसेंबर २०१० मध्ये ) मी हिमालयातला एक प्रवास करण्याचं ठरवलं. मी लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरीला होतो. माझ्याआधी ऑफिसमधले चार ते पाचजण तो प्रवास करून आले होते. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया (YHAI) सोबत मनाली येथे 'सर पास' ट्रेक. या प्रवासावर ली पुस्तक लिहिलं. पण ते पुस्तक लिहायचं आहे या हेतूने मी हा प्रवास केलं नव्हता. तेंव्हा मला नुकतीच छायाचित्रणाची आवड होती. नवा कॅमेरा असल्याने शक्य तो नेहमी सोबत असायचा. त्यामुळे मी तो 'सर पास' ट्रेकसाठी सोबत नेला होता. जे आधी जाऊन आले होते त्यांच्या सल्ल्यानुसार मी सहा अतिरिक्त बॅटरी ( विद्युत घट) सोबत घेतले होते. मुख्य प्रवासात जंगलात विजेची सोय नव्हती.  मे महिन्यात तो ट्रेक करताना सर्वात उंच ठिकाणी पोहोचण्याआधी ज्या जागी मुक्काम करण्यासाठी पोहोचलो तो क्षण हा विजयी क्षण होता. पण तो साजरा करत नाचत असताना कॅमेराची कमरेच्या पट्ट्याला असलेली पकड सैल झाली नि कॅमेरा दरीत माझ्या डोळ्यांसमोर घरंगळत खाली गेला. आमच्यासोबत शेर्पा होते. त्यांना वेगाने चढण्याची-उतरण्याचा सराव नव्हे सवय होती. ते ज्या वेगाने कॅमेरा शोधण्यासाठी धावले असं वाटलं की कोणीही माझ्यामुळे त्या दरीत पडेल. पण त्यांनाही तो कॅमेरा दिसला नाही. तोपर्यंत मी कॅमेरा मेल्याचं मान्य केलं होतं. मी शांत झालो त्यामुळे बर्‍याच जणांनी माझं सांत्वन केलं. पण हा कॅमेरा जर दरीत पडला नसता तर माझं पुस्तक झालं नसतं. मी पुस्तकाचा लेखक झालो नसतो. 

उर्वरित प्रवासात वारंवार कॅमेराची आठवण येत होती. कधी गरज वाटत होती. बर्‍याचदा सवयीप्रमाणे कमरेकडे हात जायचा. वाईट वाटायचं. प्रवासात घरी जाऊन काय सांगू? काय काय बघितलं ते कसं दाखवू? माझा कॅमेरा पडला नि तो कसा पडला हे कोणत्या तोंडाने सांगू? शिवाय पुढे वाटेत एक मोठा अपघात झाला त्यात ट्रक ड्रायव्हरचे जागीच निधन झाले. माझ्यासकट अनेकजण जखमी झाले. घरी गेल्यावर तर अपघाताची खून दिसणारच. मग त्या अपघाताबद्दल सांगितलं तर ज्या ट्रेकने आनंद दिला तो अनुभव घरी कोण ऐकेल? कोणीच नाही. 

बरं. लहान असल्यापासून घरी सर्व काही आईला सांगायची, सर्वांना फोटो दाखवायची सवय.  थोडी घुसमट झालेली. किमान आईला सांगण्यासाठी तरी लिहिलं पाहिजे. 

त्यावेळी लोकसत्तामध्ये ट्रेक-इट नावाचं सदर बुधवारी प्रकाशित होत असे. मी विचार केला की आपण काहीच नाही तर इतका तरी प्रयत्न करू शकतो. पण पुस्तक लिहिलं गेल्याने या प्रवासाबद्दल मी ट्रेक-इट मध्ये लिहिलं नाहीच. थेट पुस्तकाचं परीक्षण आलं. 

झालं असं की मी आधी प्रस्तावना लिहायला घेतली. ( जशी आता लिहिली तशी). मी शाळेत असताना मराठीच्या शिक्षिका श्रीमती. मीना सावंत प्रत्येक उत्तराच्या आधी आम्हाला प्रस्तावना लिहायला सांगायच्या. आधी वेळखाऊ नि निरर्थक वाटलेली ती सूचना नंतर माझे गुण वाढवण्यासाठी मदतीची ठरली होती. पण यावेळी ही प्रस्तावना थोडी मोठी झाली. कारण पूर्ण १५ दिवसांच्या प्रवासाबद्दल ते माझं मत होतं. ते मी सकाळी नाश्ता करताना मित्रांना वाचून दाखवलं. त्यांनी प्रोत्साहन दिलं. पण मी तर प्रवासाबद्दल काहीच लिहिलं नव्हतं. 

ही प्रस्तावना लिहताना मला प्रवासाचे काही टप्पे लक्षात आले. ते विसरून जाऊ नये म्हणून मी आधी फक्त मुद्दे लिहून काढायचं ठरवलं. एकदा का कामात नि नेहमीच्या व्यापात घुसलो की सगळा प्रवास आठवण्याची शक्यता कमी होती. ही प्रस्तावना नि मुद्दे मी एका फेकून देता येईल अशा अतिसध्या वहीत लिहिले होते. अजूनही मी पुस्तक लिहायचं ठरवलं नव्हतं. हे मुद्दे एकूण मिळून पंधरा पानी झाले. ऑफिसच्या कामाच्या वेळेत मध्येमध्ये इतरांच्या कॅमेरामध्ये काढलेले फोटो बघताना मला मदत झाली त्यामुळे मुद्द्यांच्या मधल्या जागेत पुन्हा मुद्दे वाढले. आता या मुद्द्यांचा त्रास होऊ लागला. इतर वेळी, म्हणजे प्रवासात, चालताना, जेवताना, एकता असताना या सर्व मुद्द्यांसकट छोट्याछोट्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. विचार केला की डोकं हलकं करणं ही माझ्या मेंदूची गरज आहे. 

लिहिलेल्या मुद्द्यानुसार मी प्रवासाआधीचं एक वर्ष  याबद्दल लिहिलं..... आणि मग पुढे प्रवासात जे जे घडलं ते सर्वच्या सर्व त्याच क्रमाने जितकं लिहिता येईल ते लिहिलं. जे गरजेचं नाही, जे वाचण्यासारखं नाही, जे वाईट दिसलं, अनुभवलं तेही लिहत गेलो लिहत गेलो. सुंदर गोष्टींची स्तुति केली. चुकीच्या गोष्टींची टीका केली. स्वतःचे विचार, कृती आयुष्य यांच्याशी तुलना करत लिहिलं. ज्यावेळी मी मुख्य प्रवासाच्या दुसर्‍या दिवशीचं वर्णन लिहिलं तेंव्हा ते शेतकर्‍याशी नि पर्यायाने समाजाशी जोडलं गेलं तेंव्हा माझ्या लक्षात आलं की आता हे लिखाण पुस्तक होऊ शकतं. आणि हाच तो क्षण जो पूर्ण लिखाण आणि पुस्तक प्रकाशन त्याच्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन यांच्यापेक्षाही खूप  मोठा आहे. सर्वात जास्त आनंद हा लिहताना होऊ लागला. 

marathi blog on writing a book
माझे पहिले पुस्तक

पहिलं पुस्तक लिहिणार्‍यांसाठी स्वानुभवातून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेन.
१. पुस्तकासाठी लिखाण करताना ते पहिलं स्वतःच्या हाताने वहीत लिहावं. एकदा लिहण्यास सुरूवात केली की शक्यतो त्याच विषयावर लिहिल्यास उत्तम. वाचनही त्याच प्रकारातलं किंवा आपल्या पुस्तकासाठी केल्यास उत्तम. ( मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित 'महानायक' नि 'चार्ली चॅपलिन' यांच्या आयुष्यावर आधारित 'हसरे दू:ख' वाचत होतो. अडचणींवर मात कसं करायचं हे लिहताना त्यांची शैली आपोआप माझ्या लिखाणात आली असं मला वाटतं. )

२. सुरूवातीला फक्त लिहत सुटावं. चांगलं लिहिलं की वाईट? लोकांना आवडेल का? हे लिहिणं योग्य आहे की काही आक्षेप घेतला जाईल? हे खरं की खोटं हे कसं तपासायचं? व्याकरणदृष्ट्या हे शुद्ध आहे का? या गोष्टींचा विचार पहिल्या कच्च्या लिखाणात करू नये.

३. पूर्ण लिखाण झाल्यानंतर वरील सर्व गोष्टींचा विचार जरूर करावा. नको असलेल्या व अतिमहत्त्वाच्या असलेल्या घटना किंवा वाक्यांना रंग द्यावा. 

४. पहिलं लिखाण झाल्यानंतर आधी त्यातल्या नको त्या गोष्टी पूर्णपणे काढाव्यात. पूर्ण पुस्तक पुन्हा लिहावं. ( मी तीनवेळा लिहिलं होतं. काही वर्षांनी दहा वेळा लिहणारे लेखकसुद्धा मला भेटले. )

५. पूर्ण लिखाण झाल्यानंतर ते 'टायपिंग' साठी सुरू करावं. पहिल्यांदा टायपिंग झालं की तेंव्हापासून टायपिंग व व्याकरणातल्या चुकांकडे लक्ष द्यायला सुरूवात करावी. या चुका शेवटपर्यंत सापडत राहतात. प्रूफ रीडिंगसाठी नेहमीच ते योग्य अनुभवी व्यक्तीच्या हाती द्यावं.

६. आपले विचार, अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या वयाच्या, स्त्री-पुरूष दोघांना दिल्यास उत्तम. त्यांचे विचार हे त्यांचेच असले तरीही आपले विचार अधिक योग्य नि समर्पकपणे मांडता कसे येतील त्या गरजेनुसार बदल करावे किंवा आपल्या लिखाणासाठी उदाहरण द्यावे.  पुस्तक झालं नाही तरी विचारांमध्ये सुधारणा होण्यासाठी ही कृती फार महत्त्वाची आहे.

७. पूर्ण पुस्तक वारंवार वाचावे बर्‍याच वेळा वाचतानाही लेखकाला कंटाळा येऊ नये. जे वाचताना कंटाळा येईल तिथे अवश्य बदल करावा. शक्य असल्यास ते काढून टाकावे.

८. पुस्तकाचे प्रकरणांमध्ये सुरूवातीलाच विभाजन करावे, समर्पक शीर्षक जरूर असावे. 

टायपिंग केलेल्या पुस्तकाचे ' PAGE SETUP' आधीपासून करावे. एखाद्या पानावर एखादे वाक्य किंवा परिच्छेद तुटता कामा नये. अगदीच नाईलाज असेल तर हरकत नाही.

९. आपल्या जवळच्या व्यक्तींचा उल्लेख असल्यास ते दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. 

१०. लिखाणात आवश्यक तिथे साधेपणा असावा. दरवेळी शृंगारिक किंवा अलंकारिक भाषा नसावी.

११. कथेमध्ये चढ-उतार, आश्चर्याचे धक्के, यु-टर्न, अनिश्चितता, रहस्य असल्यास उत्तम. किमान एक तरी रहस्य शेवटी उलगडावे

१२. पुस्तकासाठी चित्रं, व्यंगचित्र. नकाशा, मुखपृष्ठ, मलपृष्ठ यांचा आधीच विचार करावा. 

नवलेखकांनी, पुस्तक करू इच्छिणार्‍या लेखकांनी जरूर संपर्क साधावा. कदाचित या लेखा व्यतिरिक्त अजून काही माहिती तुम्हाला आवश्यक वाटेल.



वरील लेख लिहिण्याबद्दल मी पात्र आहे की नाही हे माहीत नाही.

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
१२ कृती पुस्तक लिहिताना १२ कृती पुस्तक लिहिताना Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 25, 2020 Rating: 5

13 comments:

  1. छान माहिती..इतक्या तळमळीने सांगणे हे मुरब्बी रसिक वाचक आणि लेखकाचे लक्षण आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद राहुलजी. लिहिता येणार्‍या प्रत्येकाने काहीतरी लिहावं आणि पुस्तक लिहू इच्छिणार्‍या प्रत्येकाला काहीतरी मार्गदर्शन मिळावे म्हणऊन हा प्रपंच.

      Delete
    2. खूप छान माहीती समजेल अशी

      Delete
  2. मी माझं पुस्तक लिहून पूर्ण केलं आहे. पण ते प्रकाशित कसं करावं याबद्द्ल सहकार्य मिळेल का?

    ReplyDelete
  3. पुस्तक प्रकाशित कसे करावे यावर आधारित अनुभव या लिंकवर वाचवा ही विनंती.
    या लेखात तुम्हाला अपेक्षित असलेली नेमकी माहिती मिळेलच असे नाही त्यामुळे मला रविवारी संपर्क करा.
    ९८१९ ६६३ ६३०

    ReplyDelete
  4. तुमच्याशी संपर्क कसा साधू शकतो. पुस्तक लेखनाबद्दल तुमची मदत हवी असेल तर कराल का?

    ReplyDelete
    Replies
    1. मला संपर्क करा ९८१९६६३६३०

      Delete
  5. How to write well in Marathi, I am unable to write well.

    ReplyDelete
  6. खरंतर चांगलं लिखाण लिहिण्याआधी जितकं लिहिता येईल तितकं लिहून झालं पाहिजे. एकदा साधे लिखाण लिहून झाले की नवीन नवीन विषय सुचतात. नव्याने सुचलेल्या विषयावर लिखाण करून प्रकाशित केले की आपले साधे लिखाणसुद्धा फुलवता येते. एकदा नाव झाले की त्याच लेखकाचे साधे लिखाणसुद्धा आवडीने वाचले जाते.
    वेगवेगळ्या विषयांवर लिहिता लिहिता अचानक आपल्याला केंव्हाही सूर सापडू शकतो. त्यामुळे लिहत राहिलं पाहिजे तसंच वाचत राहिलं पाहिजे. आपल्याला एखाद्या लेखकाची शैली आवडली की त्याचे पुस्तक वाचत असताना लिहिलं की नकळत आपल्या लिखाणात त्यांची शैली झिरपते. वाक्य लिहिण्यापेक्षा शब्दांची गुंफण हवी.

    काही लिंक देतोय त्या पण जरूर वाचा.

    https://pankajpghare.blogspot.com/2021/06/marathi-blog-what-to-write.html

    https://pankajpghare.blogspot.com/2020/05/marathi-blog-writing-a-book.html

    ReplyDelete
  7. आपण दिलेली माहिती खूप छान आणि उपयुक्त आहे. मी माझा लघु कथा संग्रह '(अंदाजे १८५ पाने) लिहिला असून त्या करिता copyright करणे आवश्यक आहे का ? त्याकरिता पूर्व तयारी काय असावी ? कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती . संतोष देसाई, मुंबई ९८६९४५२५५३

    ReplyDelete
    Replies
    1. मला संपर्क करा ९८१९६६३६३० . सविस्तर बोलू.

      Delete
  8. <a href="https://www.parissparsh.com>Visit our Marathi Booksstore : www.parissparsh.com</a>

    ReplyDelete

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.