सफरछंद- युथ हॉस्टेलसोबत लडाखप्रवास

सफरछंद: लडाख सायकल प्रवासवर्णन: Youth Hostel Association of India सोबत केलेल्या सायकल प्रवासाचे पुस्तक 

सफरछंद - लडाखप्रवास 

marathi blog a book on cycling at Laddakh
पुस्तक : सफरछंद - लडाख सायकलप्रवासवर्णन 

अंधारावर मात करत उगवणारा सूर्य वातावरणात चैतन्य आणतो आणि अशावेळी सर्व पक्षी-प्राणी आणि अगदी कीटकसुद्धा नव्या जोमाने कामाला लागतात. अनेक ऊर्जांप्रमाणे यावेळी मिळणारी ऊर्जासुद्धा फक्त मनुष्यप्राणी वाया घालवतो. याचवेळी केलेला व्यायाम पूर्ण दिवसभरासाठी आपल्या शरीरात दोन दिवसांची ऊर्जा देत असतो. 

बदलत्या जीवनशैलीनुसार चांगल्या सवयी फार कमी जणांमध्ये आढळतात. तरीही ठाण्यातल्या अनेक रस्त्यांवर अनेकजण एकटे किंवा गटागटाने अगदी शिस्तीत सायकल नियमित सायकलप्रवास करतात.

शारीरिक नि मानसिक व्यायाम, दिवसभरासाठी मिळणारा उत्साह नि आत्मविश्वास, दीर्घकालीन फायदे, दैनंदिन आयुष्यात वापर, शक्य झाल्यास दूरवरचा प्रवास, लहानमोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग नि यश या आणि अशा अनेक कारणांसाठी सायकलचे अस्तित्व आजही टिकून आहे. 

परंतु इच्छा असूनही केवळ सायकल चालवता येत नाही या साध्या कारणामुळे अनेक सायकलस्वारांची संख्या कमी जाणवते. 

कुणी सायकल शिकवली नाही, कुणी सायकल हातातही दिली नाही, लहानपणी चालवली पण नंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे सरावच नाही या आणि अशा अनेक कौटुंबिक नि सामाजिक कारणांमुळे सायकलस्वारांची संख्या कमी असणं साहजिकच आहे. 

केवळ स्वत:ची शक्ती वापरून चालवलं जाणारं एकमेव वाहन म्हणजे सायकल.....

वयाची अट नसलेलं एकमेव वाहन कोणतं ? तर ते सायकल......

सर्वात कमी वजन, कमी जागा व्यापणारी, कमी किमतीची, (बनवण्यासाठी , समजण्यासाठी आणि चालवण्यासाठी) सोपी, सहज मिळणारी, अनेकांचा छंद, वाहन म्हणजे सायकल.......अनेकांच्या लहानपणीच्या अनेक आठवणींची साक्षीदार......    

कुणाला वडीलांनी दोन्ही हातांनी सायकलला घट्ट पकडत सोबत धावत असल्याचं आठवतं तर कुणाला शिकताना कुठेही पडल्याचं आठवतं......

कुणाला ते फक्त पोस्टमनचं वाहन वाटतं तर कुणासाठी ते निवडणुकीचं चिन्ह........

डबेवाल्यांसाठी नि अनेक रोजगारांसाठी तीे आजही महत्त्वाची,
काहींनी तिचा वापर करुन सर्कशीत कसरती केल्या तर काहींनी तिला चक्क चित्रपटात महत्त्वाचं स्थान दिलं. 

काहींसाठी ते व्यायामचं साधन तर काहींची ती  दूरच्या कठीण प्रवासतली लाडकी जोडीदार........

 तर काहींसाठी ती केवळ प्रेमळ 'डबलसीट' सैर ...........

माणूस श्रीमंत असो वा गरीब, सायकल चालवताना तो भेद सहज बाजूला पडतो. ( अगदी बसायलाही प्रत्येकाला तितकीच छोटीशी जागा मिळते! वादही होत नाहीत !!) तेंव्हा शारिरीक नि मानसिक श्रीमंती कळते आणि लगेच वाढते.
           
थोडक्यात काय ? आठवणींच्या कप्प्यात आजही अनेकांच्या मनात सायकल आहे. YHAI सोबत केलेल्या प्रवासाचे हे पुस्तक आहे. 

माझ्या मनातल्या सायकलला मी सफरछंद या पुस्तकात उतरवले आहे. रसिकांनी त्याचा जरूर आस्वाद घ्यावा.

सकाळी सायकल चालवणे ही सवय नव्हे तर भारताची  संस्कृती व्हावी अशी या पुस्तकातून अपेक्षा करतो.

सफरछंद अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध 



मराठी पुस्तक (सशुल्क)  - पहिले पाऊल, सफरछंद (अमेझॉन किंडलवर उपलब्ध) तसेच THE SAR PASS TREK पहिले पाऊलचा इंग्रजी अनुवाद (अमेझॉन किंडलवर उपलब्ध)
Online Books PDF on esahity.com (free): मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
सफरछंद- युथ हॉस्टेलसोबत लडाखप्रवास सफरछंद- युथ हॉस्टेलसोबत लडाखप्रवास Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on June 02, 2021 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.