लॉकडाऊनचा व्यावसायिक सदुपयोग

लॉकडाऊनच्या काळात अनेकांचं नुकसान झालं. तरीही या वेळेत अनेकांनी अनेक कामे करून वेळेचा सदुपयोग केला. माझ्या लॉकडाऊनविषयी....

Marathi Blog - मनात आलं म्हणून

लॉकडाऊनचा सदुपयोग 

लॉकडाऊन जाहीर झाला तेंव्हा मला थोडा आनंदही झाला होता. पंधरा दिवस कोणी कामासाठी बोलवणार नाही. कामाचा फोन जरी आला तरी प्रत्यक्ष काहीच काम करता येणार नाही. त्यामुळे तेचतेच करत आलेल्या कामाला सुट्टी नि जे करायची अनेक दिवस इच्छा होती ती करायला वेळ मिळणार याचा आनंद काही वेगळाच होता. साहजिकच आर्थिक अडचण येणार हे मान्य असूनही इतके दिवस वेळेची अडचण होत होती ती दूर होईल आणि या वेळेला संधी म्हणत बरंच काही करता येईल. याची पूर्ण जाणीव झाली होती. पुढे-पुढे लॉकडाऊन वाढत गेला तसतसा कंटाळा येऊ लागला. पण आधीच वेळेचा सदुपयोग केल्याने आता हा लेख लिहताना आणि लिहिल्यामुळे पुढील कामासाठी सकारात्मक मानसिकता मिळाली आहे आणि फार समाधान मिळत आहे. वाचकांनीही लॉकडाऊनमध्ये केलेल्या किंवा झालेल्या चांगल्या घटना लिहून काढल्यास पुन्हा सकारात्मक मन:स्थितीने वळता येईल किंवा असलेली सकारात्मकता वाढेल हे अनुभवाने सांगतो 
marathi blog on work form home
लॅपटॉप आणि वही पुस्तकांनी दिली साथ  

  • व्यावसायिक जाहिराती:

मी व्यवसाय सुरू करून दीड वर्षे झाली. लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान होणार असले तरीही याआधी झालेले नुकसान भविष्यात टाळता आले पाहिजे. मी माझ्या व्यवसायाशी संबंधित जाहिराती  ( मार्केटिंग) केली पाहिजे नि त्या जाहिराती करण्यासाठी हा वेळ उत्तम म्हणून स्वत:ची नि व्यवसायाची माहिती सर्व समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडियामध्ये ) व्यवस्थित भरून पूर्ण केली. 'Whatsapp' ऐवजी Whatsapp Business' मोबाईलमध्ये समाविष्ट केले नि त्यात सर्व माहिती दिली. Facebook वर माझ्या आस्थापनेचे (कंपनीचे) Page फक्त बनवून ठेवले व इंस्टाग्रामवर कंपनीच्या नावाने खाते सुरू केले नि ते Facebook Page सोबत जोडले. आता इंस्टाग्रामवर काही माहिती दिली की ती Facebook Page वर आपोआप  जाते. हेच Facebook Page, Whatsapp Business सोबत जोडलेलं आहे. या तीनही समाजमाध्यमांसोबतच Linked-in या व्यावसायिकांशी संबंधित समाजमाध्यमात मी माझी माहिती पूर्ण केली. एकेक करून पोस्ट केल्यानंतर थोड्या दिवसांनी Facebook Page स्वीकारण्यासाठी सर्वांना आमंत्रण दिलं. 

  • ई-मेल स्वाक्षरी:

कोणालाही ई-मेल पाठवताना मजकूराखाली आपली सुंदर ई -स्वाक्षरी इतपत माझीसुद्धा सही होती. पण महितीपूर्ण सही असावी म्हणून त्यात मी सर्व समाजमाध्यमांची लिंक त्यांच्या चिन्हांसकट जोडली. एखादा शब्द लिहून हायपरलिंक देणे आणि समाजमाध्यमाच्या चिन्हांसकट लिंक जोडणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेकदा ग्राहक कंपनी प्रोफाईल मागतात. त्यामुळे ते प्रोफाईल गूगलड्राइव्हमध्ये  जोडून त्याची लिंक सहीत समाविष्ट केली. माझी कंपनी करत असलेल्या एका कामाचे छायाचित्र देऊन त्याच्यासोबत प्रोजेक्ट रिपोर्ट त्या चित्राला  हायपरलिंक करून त्या चित्राला त्या सहीमध्ये समाविष्ट केले. 

लिंक दिल्यामुळे इतकी सर्व माहिती वेगवेगळ्या मार्गाने देताना सही फार मोठी होत नाही हे लक्षात घ्या. 

  • मेलचिंप ( घोषणांसाठी)

लॉकडाऊन काळात शिकलेली आणखी एक गोष्ट म्हणजे जाहिरात किंवा शुभेच्छा देताना सुंदर नि टापटीप ई-मेल करण्यासाठी वापरले जाणारे मेलचिंप. एकाच वेळी सर्वांना एखाद्या सणाच्या शुभेच्छा देताना, कंपनीशी संबंधित विशेष माहिती जाहीर करताना ते नेहमीप्रमाणे केवळ वाक्यात न लिहिता एखाद्या निमंत्रणपत्रिकेद्वारे पाठवायचे असेल तर मेलचिंप एकदा वापरून पहा. 

  • लिंकची लांबी कमी करणे 

बर्‍याचदा आपल्याला ई-मेल लिहिताना लिंक पाठवावी लागते. या लिंकमधली अक्षरे किंवा अंक फार लांबलचक असतात. कधीकधी त्या चार ओळीच्याही बनतात. अशावेळी या लिंकची लांबी कमी झाल्यास ती मेलमध्ये दिल्यावर मेल टापटीप दिसतो. ' शॉर्ट यूआरएल' असे गूगलसर्च करावे. 

वरील जाहिराती करताना वाय-फायचा मासिक खर्च ( रू. ४३० /-) वगळता काहीच खर्च झाला नाही. शिवाय फक्त जाहिरातींसाठी वाय-फाय वापरले गेले नाही. 

  • ऑनलाइन व्यावसायिक शिक्षण 

marathi blog on online learning
ऑनलाइन शिक्षणाची सवय करावी लागेल ना 

जाहिराती वगळता स्वत:च्या ज्ञान आणि कौशल्य वाढीसाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. माझ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी  ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले की शक्यतो मी माझे नाव नोंदवत होतो. पण ज्ञान वाढवण्यासाठी मला एक किल्ली मिळाली. 

  आधीच अनेक समाजमाध्यमे असताना Linked-in वापरण्यासाठी मी टाळाटाळ करतो. तरीही योगायोगाने मी जेंव्हा Linked-in पाहिलं तेंव्हा एका मित्राने Google Ads चा कोर्स केल्याचे पाहिले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे udemy.com या संकेतस्थळावर तुम्हाला हवा तो विषय शिकता येईल हे कळले नि मी रुपये ३८०/- दराने माझ्या क्षेत्राशी संबंधित दोन कोर्स केले. याचा फायदा नंतर करून घेणे माझ्या हातात असले तरी त्याच क्षणी होणारे अनेक फायदे माझ्या वाट्याला आले. udemy.कॉम वर अनेकविध विषयांवरचे कोर्स मोफत उपलब्ध झाले. आतापर्यंत मी माझ्या गरजेचे २४ कोर्स पूर्ण केले नि अनेक आवडीचे विषय अजूनही शिल्लक आहेत. 

  • उलाढालीचा चढता आलेख 

गेली 15 वर्षे एक्सेल वापरत असल्याने मला एक्सेल वापरता येते; पण त्या एक्सेलमध्ये आलेख कसा बनवतात हे मला अजिबात येत नव्हते. हे मी Udemy.com वर शिकलो. माझ्या व्यवसायाचा आलेख आता माझ्या डोळ्यांसमोर असतो. ज्यामुळे लॉकडाउनमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी या चढत्या आलेखाला डोळ्यांसमोर आणून व्यावसायिकाला प्रोत्साहन मिळू शकते. 

एका विषयाचे शिक्षण मोफत नसल्याने व ते सहजा शिकवले जात नसल्याने लॉकडाऊन नंतर आर्थिक प्राप्ती झाली की शिकण्याचा बेत आहे. माझ्याकडे दूसरा पर्याय नाही. Udemy.com ही फक्त लॉकडाउनमधील नव्हे तर माझ्या कारकीर्दीतील निर्णयांपैकी एक उत्तम निर्णय आहे. 

  • ब्लॉगिंग 

वरील कोर्सपैकी एका कोर्स बद्दलसांगत मी माझ्या वैयक्तिक नि त्याद्वारे व्यावसायिक फायदा या विषयाकडे  वळेन. कारण  हे सर्व करताना काही वैयक्तिक नि राहून गेलेल्या गोष्टी करायच्या मनात होत्या. त्या करताना पुन्हा त्याचे व्यावसायिक फायदेही झाले हे सांगताना समाधान नि आनंद वाटतो. 
marathi blog on writing blog
ब्लॉग लेखन - एक सुंदर अनुभव 

  • मराठी लेखांसाठी ब्लॉग  

Udemy.com वर ब्लॉग कसा बनवावा, संकेतस्थळ (वेबसाइट) कशी बनवावी याबद्दल दोन कोर्स करतानाच SEO रॅंकिंग या शब्दाशी माझी ओळख झाली. या SEO रॅंकिंगसाठी https://neilpatel.com/ या संकेतस्थळापर्यंत येऊन पोहोचलो. वरील दोन्ही संकेतस्थळांनी  वकोर्र्र्व सुरू केलेला माझा Marathi Blog- मनात आलं म्हणून या ब्लॉगमध्ये मला बर्‍याच तांत्रिक सुधारणा करता आल्या. २०१२ पासून ब्लॉग हा फक्त मी लिहिलेले लेख नि छायाचित्रे कुठेतरी असावीत या हेतूने सुरू केला होता. त्याला २०२० मध्ये एकूण मिळून १०००० लोकांनी पाहिल्याचा मला आनंद किंवा दु:ख नव्हते. पण Marathi Blog- मनात आलं म्हणून या ब्लॉगला दोन वर्षांत अनेक नवे-जुने लेख लिहूनसुद्धा केवळ ५००० व्हिजिट असल्याचं मला आश्चर्य होतं. 

मला सांगितलेल्या सुधारणा, त्यावर केलेले उपाय, ब्लॉगचा केलेला प्रसार, लॉकडाऊनमुळे लोकांचे ऑनलाइन वाढलेले वाचन यामुळे दोन महिन्यांत १०००० व्हिजिट मिळाल्याचा आनंद आहे.अजूनही Google Adsense  स्वीकारणा होणे बाकी आहे. ते ज्या कारणामुळे बाकी आहे ते बहुतेक (Backlink) बॅकलिंक नसल्याने असावे असा अंदाज आहे. त्यामुळे माझ्या विविध विषयांवरील लिखाणाची लिंक एखाद्या वेबसाइटवर असावी या प्रयत्नात असताना लोकांना भाज्या नि फळे घरपोच सेवा देणार्‍या एका वेबसाइटसाठी लॉकडाऊनमधील खरेदी या विषयावर माझ्या लिखाणाची लिंक दिली.  शिवाय अनेक लिंक Quora.com या संकेतस्थळावर प्रश्नांची उत्तरे देताना वापरली आहेत. बघू पुढे काय होतं ते.

लॉकडाऊनमुळे झालेल्या नि पुढे होऊ शकणार्‍या समस्येला आणखी एक आर्थिक स्त्रोत जोडला जावा हा हेतू. 

  • व्यवसायविषयक ब्लॉग 

मी पुन्हा उद्योग या विषयाकडे वळतो. माझा Marathi Blog- मनात आलं म्हणून  हा ब्लॉग मराठीत असून दोन वर्षांत त्याला आजपर्यंत केवळ १५००० जणांनी व्हिजिट केल्याचा नि ब्लॉगिंगचा एकूण नऊ वर्षांचा अनुभव माझ्या व्यवसायासाठी 
कामी यावा या हेतूने मी इंग्रजी भाषेत ब्लॉग सुरू केला. 
इमारतींना बाहेरून काचा किंवा इतर साहित्य वापरून त्यांना सुंदर केले जाते. ते सुंदर करणे किंवा त्याची देखभाल करणे ( Facade Fabrication and Maintenance) हा माझा व्यवसाय असल्याने त्याच्याशी संबंधित Facade Maintenance हा ब्लॉग सुरू केला. तो इंग्रजीमध्ये असल्याने तो अनेक देशांत पाहिला गेला नि केवळ एका मे महिन्यात तो किमान ३० देशांतील ३००० लोकांकडून पहिला गेला नि अनेकांनी लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष काम करण्यासाठी कोटेशन ( खर्चाचा अंदाज) मागितला. याला मी  Marathi Blog- मनात आलं म्हणून  च्या अनुभवाने दिलेले यश मानतो. 

इंग्रजी व्याकरण नि स्पेलिंग सुधारणा 

इंग्रजीतून ब्लॉग लिहिताना Grammerly या एक्सटेन्शनची ओळख झाली. गूगलवर Grammerly शोधून ते कायम जोडलेले ठेवल्यास इंग्रजीतील व्याकरण आणि स्पेलिंगच्या चुका टाळता येतात आणि फार मदत होते.

केवळ ब्लॉगसाठीच नव्हे, ई-मेल लिहितानाही हे एक्स्टेंशन वापरून तुम्ही चांगला ई-मेल लिहू शकता. 
 वापरून पहा. जास्त समजेल. 

ई- बिझनेस कार्ड:

वरील सर्व माहिती देण्याचा अजून एक मार्ग म्हणजे ई- बिझनेस कार्ड. आतापर्यंत अनेकजण स्वत:चे कार्ड पाकीट किंवा खिशातून काढून ग्राहकाला किंवा माल पुरवठा करणार्‍याला देत असे. कोरोनाकाळानंतर हा संपर्क कागदाद्वारे टाळणे आणि कागदापेक्षा जास्त माहिती देणे यासाठी ई- बिझनेस कार्ड फार सोयीचे ठरेल. एकदा वापरून पहा. 

मी माझ्या व्यवसायाची जाहिरात करतोय असे समजा किंवा असे समजा की हे ई-बिझनेस कार्ड काय आहे नि ते मोफत कुठे मिळेल याची लिंक देण्यासाठी मी माझे ई-बिझनेस कार्ड खालील लिंक मध्ये देत आहे.


(वरील सर्व कृती करताना माझ्याकडे लॅपटॉप आहे नि वाय-फाय हे लॉकडाउन सुरू झाल्यावर लगेच घेतले होते, लॅपटॉप असल्यास या सर्व कृती करणे जास्त सोयीचे होते याची व्यावसायिक वाचकांनी नोंद घ्यावी. )

लॉकडाऊनमध्ये  मिळालेल्या वेळेचा फायदा छंदांसाठी कसा झाला यावर लवकरच लेख प्रकाशित करेन. 


मराठी पुस्तक ( सशुल्क)  - पहिले पाऊल , सफरछंद ( बूकगंगा. कॉम वर उपलब्ध )
Online Books PDF on esahity.com ( Free) : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.

लॉकडाऊनचा व्यावसायिक सदुपयोग लॉकडाऊनचा व्यावसायिक सदुपयोग Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on June 10, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.