गड किल्ल्यांच्या नावावरून आणि तिथल्या वैशिट्यावरून एक कल्पना सुचली. त्याद्वारे विशिष्ट पद्धतीने गडांची नावे लिहिली. नाव लिहिण्याचा हा वेगळा प्रयत्न
Marathi Blog - मनात आलं म्हणून
किल्ल्यांची नावे सुलेखन पद्धतीने
रायगड (सुलेखन पद्धतीने ) |
नावात काय आहे ? असे ब्रिटनी स्पिअर म्हणाली होती. (शेक्सपिअरचे नाव मुद्दामच टाळले आहे) एखादे नाव चुकीच्या ठिकाणी वापरले तर कसे वाटते हे त्यालाही कळू दे. पण आपला मुद्दा तो नाही. गड-किल्ल्यांची नावे देखील अगदी लक्षात राहण्यासारखी आहेत आणि ती कॅलिग्राफी ( सुलेखन) द्वारे मांडली तर नावात काय आहे याचे उत्तर मिळते.
प्रत्यक्षात किती इतिहास घडला, किती लिहून ठेवला, किती खरं इतिहास प्रकाशित झाला, किती इतिहास लोकांपर्यंत पोहोचला, किती लक्षात राहिला आणि त्यापासून आपण किती शिकलो याचा विचार केला तर ती खूप मोठी गळती आहे. एखाद्या गडाविषयी लिहायचे तर किती लिहू आणि किती नको असे होते. लिहूच नको असे अभिप्राय मिळण्याआधी त्यात नाविन्य आणणे गरजेचे वाटू लागले.
लोहगड , लोणावळा |
वाचनातून आणि प्रत्यक्ष अनुभवातून बरेच काही कळू लागले आणि डोक्यात साचू लागले की एखाद्या माध्यमातून ते बाहेर येणेही गरजेचे वाटू लागले. पण बऱ्याच परिचित गडांबद्दल पुनःपुन्हा वाचनात येते. लांबलचक इतिहास आणि प्रचंड विस्तार असलेल्या दुर्गांविषयी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना बऱ्याच मर्यादा येतात.
गोरखगड |
त्यामुळे त्यांविषयी लिहिण्याऐवजी सुलेखनाचा माध्यम देखील योग्य वाटला. शिवाजी महाराजांविषयीची माहिती महाराष्ट्रापुरता मर्यादित नसावी तशीच गड-किल्ल्यांविषयी आवड इतर क्षेत्रातही पसरावी. जेंव्हा लिहून ठेवावेसे वाटू लागले. तेंव्हा त्या गडाचे नेमके वर्णन करताना शब्द कमी पडतात. कधी कधी वर्णन करताना तो भाग विशिष्ट अक्षरासारखा आहे असे लक्षात येते किंवा दुरूनच एखादे अक्षर दिसते.
हरिश्चंद्रगड |
लोकांना फार कमी गडांची नावे माहित आहेत. जरी नावे माहित असली तरी त्यांची फार कमी वैशिष्ट्ये माहित आहेत. त्यामुळे सुलेखानाद्वारे ती मांडण्याचा प्रयत्न करतोय.
तोरणा किल्ला |
रायगडचे टकमक टोक, मनोरे, रोप-वे हे इतकेच मांडले आहे. हरीश्चंद्रगडावर दिसणारे इंद्रावज्र हा निसर्गाचा चमत्कार दाखवला आहे आणि वक्राकार अक्षरे काढताना तेथील कोकणकड्याचा विचार केला. अणकुचीदार लोखंडी दात असलेला दरवाजा, विंचूकाटासाठी नांगी आणि प्रवेशद्वाराशी बांधलेली भिंत लोहगड हा शब्द लिहिताना वापरला आहे.
प्रतापगड |
कळसूबाई |
अफजलखान वधावेळी वापरलेली हत्यारे म्हणजे बिचवा व वाघनखे तसेच गडाची दुहेरी तटबंदी व झेंडा बुरूज दाखवता आला. तोरणा हा शब्द दारावरील ‘तोरण’प्रमाणे रंगवला आहे. आजोबा व्यक्तिरेखेशी संबंधित लिहिला असून कलावंतीण लिहिताना प्रत्यक्ष गडाचा आकारच वापरला आहे.
आजोबा गड आसनगाव |
गेल्या दहा वर्षांपासून सुलेखनाचा प्रसार करणाऱ्या आणि डिसेंबर २०१५ पर्यंत १ करोड लोकांपर्यंत प्रसार करण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करत असलेल्या ‘अक्षरगंध’ या संस्थेने ‘अक्षरजत्रा’ या नावाने २० ते २२ डिसेंबर या कालावधीत अक्षराशी संबंधित प्रदर्शन आयोजित केले होते. किल्ल्यांच्या नावांनाही त्यांनी प्रदर्शनात स्थान दिले. त्यांच्या प्रदर्शनाद्वारे गडांची नावे व या लेखाद्वारे सुलेखनाचा प्रसार या दोन्ही गोष्टी घडून आल्या आहेत.
तुमचे मत नक्की कळवा.
अधिक वाचा
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
८ किल्ल्यांची नावे सुलेखनद्वारे
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
June 04, 2020
Rating:
Very nice !!
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete