(खालील लिंकवर 'कांदेपोहे'ची नकाराआधीची कहाणी वाचावी. मग ही पोस्ट वाचावी. ही विनंती )
ज्या मुलीला भेटीसाठी बोलावलं तिने नकारानंतरही पाठलाग सोडला नाही.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
'कट्यार काळजात घुसली' फार मनापासून आवडला. जेवलो, नंतरही टी.व्ही पाहिला, टाईमपास केला. त्यामुळे डोक्याला बाम लावावा लागला नाही. घडलेला (अति)प्रसंग घरी एका सूरात सांगितला. मनापासून स्थळ नाकारावं असंच होतं ते. त्यामुळे घरून 'का नाकारलंस त्या मुलीला' या विषयावर 'डिनर पे चर्चा' झाली नाही. फक्त त्यादिवशी लगेच नकार देणं हे तिलाच काय कोणालाही दुखवण्यासारखी कृती असती. शिवाय मी रागीट आहे हे तिच्या पत्रिकेच्या गहन अभ्यासानुसार सिद्ध झालं असतं. पत्रिकेवर विश्वास बसला किंवा वाढला की चुका किंवा अपयशाला आयतं कारण मिळतं. मग सवय लागते नंतर तीच मानसिकता होते नि इतर विषयांसाठीसुद्धा पत्रिकेचा आधार घेतला जातो.
दुसरा दिवस. ऑफिसमध्ये चहा पिताना मित्रांना कांदेपोह्यांचा किस्सा सांगितला. एक मॅडम म्हणाल्या की त्यांना असं वाटतं की तिच्याशीच लग्न होईल. मी कारण विचारलं तर म्हणाल्या की "opposites attracts". आता मात्र मी घाबरलो. ह्या मुलीला लवकरात लवकर नकार कळवणं ही तर श्रींची इच्छा !! असं मी मनात म्हटलं. ऑफिसमधून बाहेर येऊन मग ट्रेनमध्ये शिरण्याआधी औपचारीक नकाराचा संदेश (मराठीत मेसेज) पाठवला ( सेंड केला ).
अगदी काही क्षणात कॉल आला, " तुमचा नकार आहे, ठीक आहे, No problem at all. पण मला तुमचा नकार का कळेल का ? म्हणजे मला पुढच्या वेळी हेल्प होईल."
" ठीक आहे." म्हणत मी संभाषण संपवलं ( मराठीत कॉल कट केला). मोबाईल खिशात ठेवला.
पुन्हा कॉल. " अहो तुम्ही सांगताय ना, मग कॉल का कट केला ?"
मी- " अहो मी ट्रेनमध्ये आहे. माझ्या आजूबाजूला माणसं आहेत मी नाही बोलू शकत आणि स्पष्ट ऐकायला पण नाही येत."
" ठीक आहे, मग message करा."- ती. मीही ओके म्हटलं. बसायला जागा मिळाली. Whatsappवर आधीच मेसेजेस होते की मला नकाराचं कारण द्या.
विचार केला की इतकं कोणी विचारतंय तर आपण मदत केलीच पाहिजे. तिचं बोलणं, आधी घेतलेलं शिक्षण, आताची नोकरी, भविष्यात सिरीअलमध्ये काम करायची इच्छा, फक्त बिर्याणी बनवणं, स्वत:चेच कपडे न आवडणं या तिच्यातल्या न आवडलेले मुद्दे होतेच. माझं Trekking नि मराठी न आवडणं , माझे केस, पत्रिका पाहून पुरता समजलेला माझा स्वभाव, माझं कोणत्याही गावात खाणं अशी अनेक कारणं होती नकाराची. यातली कोणती सांगू ? मी तिला ५ मुद्दे ( मराठीत Points ) द्यायचं ठरवलं. लिहता लिहता आठवलेले अजून Points आठवले. लिहत असताना " माझ्यावर पुस्तक लिहताय का ?" असा मेसेज आला.

मनातल्या मनात तिला मी " आवशीचो घो तुझ्या" म्हटलं.
लिहायचं संपणार तितक्यात तिचा फोन आला, " अहो मला Please कळू द्या नकाराची कारणं ".
आता मात्र हद्द झाली. मी म्हटलं, " आता बघाच तुम्ही".
मी त्या मुलीला तिने उच्चारलेल्या वाक्यासकट कारणं दिली. (म्हणजे ' लावा रे तो Video ' सारखं ) माझ्या प्रत्येक वाक्याआधी ' तुम्ही म्हणालात की ' अशी सुरूवात होती. त्या काळात मी बर्याच Meetings ( मराठीत मिटींगी ) Attend करायचो. लगेच MOM बनवून सर्वांना मेल सेंडायचो. मुद्दे लिहून झाल्यावर मी ह्या मुद्दयांना क्रमांक ( मराठीत नंबर ) दिले तो आकडा १६ होता. तिला वाईट वाटलं तर Delete करू ? पण आता इतकं टायपून झाल्यावर ते डीलीटायचं म्हणजे हेही कष्ट आणि आधीच्या Typingच्या कष्टावर पाणी पडणार असतं. म्हणून दिली कारणं पाठवून.
अगदी वेगाने निम्म्याहून अधिक वेगाने बर्याच नंबरच्या पुढे Not agree असा रिप्लाय आला. मी मेसेज थांबवले. ही मुलगी तर आता भांडणार त्याआधी मी तिला मी तिला ब्लॉक केलं. तर तिचे SMS येणं सुरू झालं. आता मी तिचा मोबाइल नंबर ब्लॉक केला. दुसर्या दिवशी सकाळी Facebookवर बरेच मेसेज आले. मी तिथेही तिला ब्लॉक केलं. कंटाळा आला.
तिसर्या दिवशी.......
एका नवीन नंबरहून तिच्या ताईचा सॉरीचा मेसेज आला. आमची मुलगी थोडी आगाऊ आहे. Arranged Marriage
एका नवीन नंबरहून तिच्या ताईचा सॉरीचा मेसेज आला. आमची मुलगी थोडी आगाऊ आहे. Arranged Marriage
मध्ये दुसरी संधी नसते पण तरीही तुम्ही पुन्हा एकदा भेटून विचार करा या विनंतीला मी सॉरीचा रिप्लाय दिला.
एक आठवड्यानंतर नव्या मुलीचा फोन आला. स्वत:चं नाव सांगून ती म्हणाली, "मी HR आहे. आमच्याकडे Employees Consultancyसाठी येतात." मला हे नवीन स्थळ आहे वाटलं. पण ती आधीच्या मुलीची मैत्रिण होती. म्हणाली की तुम्ही एकदा तिच्याशी बोला. रडून रडून तिचे डोळे सुजलेत. दोन दिवस ती ऑफीसला आलीसुद्धा नाही.
मी म्हटलं "ठीक आहे. मी बोलतो." ( मी मोठा समजूतदार होतो ना ?) तिने मला मी ब्लॉक केलेला तिचा नंबर अनब्लॉक करायला सांगितलं. मनात दया येऊन मी केलंही. कोणती HR, Employeeच्या लग्नाचा विचार करते ? मला समजत होतं तरी एका अनोळखी व्यक्तीला दु:खं होऊ नये म्हणून माझी बोलण्याची तयारी होती.
काही दिवसांनी मग मला त्या मुलीचा Good Morning ऐवजी 'सुप्रभात' असा मेसेज आला. थोड्या वेळाने तिची एके काळी एका मासिकात प्रकाशित झालेली कविता पाठवली. मी ती पाहिलीच नाही. नंतर एका सोमवारी कुठेतरी केलेल्या Trekचा फोटो पाठवला. मी सावध भूमिका घेत तोही दुर्लक्ष केला आणि अचानक एक दिवस तिचा फोन आला नि म्हणाली, "Thanks, तुमच्यामुळे मला मदत झाली. तुम्ही मला जे Points दिले त्यामुळे कळलं की कसं वागायचं नाही आणि आता माझं लग्न पण ठरलं."
तिच्या लग्नाचा आनंद तिच्यापेक्षा मला झाला होता; पण मी साध्या स्वरात तिचं अभिनंदन केलं. कारण काहीच देणंघेणं नव्हतं तिच्याशी.
पुढे ती म्हणाली, " खरंतर तुमचं नशीब चांगलं नाही हे मला पत्रिका बघून कळलंच होतं."
" हो हो, तुम्ही भेटलात तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं. पण एक सांगू का ?"
" हो, सांगा ना."- ती.
" तुमचं अभिनंदन पण त्या मुलाला All the Best सांगा."

अजून काही विनोदी आठवणी :
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
आठवणीतले कांदेपोहे-नकारानंतर
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: