केवळ Likes, Comment आणि Shareमुळे आपण फार गैरसमज पसरवत आहोत, शिवाय स्वतःचं मत हे स्वतःचं राहिलं नाही. याविषयी
Marathi Blog - मनात आलं म्हणून
Social Media वापरताना
orkut पासून बहुतेकांनी सुरूवात केली. तेंव्हा होणारा Social Mediaचा वापर आणि आज होणारा वापर यात फार फरक आहे ना ?
तेंव्हा आपण हरवलेले जास्तीत जास्त मित्र शोधले होते. जास्तीतजास्त Likes किंवा Followers मिळवण्याची इच्छा नव्हती. मोबाईलसुद्धा तशा Appने भरलेली नव्हती. Internet सेवासुद्धा महाग होती. आपण आपल्या सोबत असलेल्यांशी जास्त बोलायचो. हा इतिहास झाला.
'ज्ञान मिळवण्यासाठी मात्र Google वर सर्च करायचो.'
हेच मला सांगायचंय आणि आपण सध्या जसा Social Mediaचा वापर करतोय त्यात आपलं नुकसान कसं होतंय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय.
Internet वापरुन जगाची माहिती मिळते अशी आपली Internetशी झालेली ओळख. Wikipedia, Encyclopedia अशा अनेक Websitesमुळे कोणत्याही विषयावर माहिती मिळायची. अर्धा तास इंटरनेट वापरण्यासाठी ३० रू. द्यावे लागायचे. हळूहळू मोबाईल बदलले , Androidची entry झाली, Datapack स्वस्त झाले नि चित्र बदललं. Social Meida अस्तित्वात आला. Facebook, whatsapp, twitter, instagram अशा अनेक Website अस्तित्त्वात आल्या.
१. Internetवर 'माहीत नसलेली खरी माहिती' मिळते हा विश्र्वास होता.
२. Internet 'कनेक्शन'मुळे केवळ Social Mediaसोबत 'कनेक्शन' झालं.
३. ज्ञानासोबत कनेक्शन होईलच असं नाही.
पण.....
Social Mediaद्वारे ज्ञान मिळतं हा Usersचा झालेला गैरसमज आहे. बघा. म्हणजे आपण स्वत:ला ' Social Meida'चे Users म्हणतो, Students (विद्यार्थी) नव्हे.
बरं आता गैरसमज झालाच आहे, तर त्या मोठ्या गैरसमजाचा वापर करून मूळात असलेल्या अज्ञानाचा नि अशिक्षितपणाचा फायदा कुणीही करून घेऊ शकतं जे केंव्हाच सुरू झालंय.
उदाहरणार्थ, मी स्वत: कायदा, अर्थ, आरोग्य, जेवण बनवणे, याबद्दल 'अज्ञानी' आहे. याचं ज्ञान शक्य असेल तर मी ते पुस्तकात मिळवेन नि जे एका माणसाकडून शिकता येईल ते त्याच्याकडून शिकेन. पण मला ज्याचं ज्ञान नाही ते केवळ विश्र्वसनीय Websiteवर मिळवेन, Social Mediaवर नव्हे.
पण सध्या होतंय काय?
सध्या बहुतेक सर्वजण 'वाट्टेल' त्या ..... नव्हे 'दिसेल' त्या विषयावर व्यक्त होतात. अगदी कमी शिकलेले, भाषेचे- English चे वांदे असलेले भारत-अमेरिका संबंध, डॉलरचा भाव, भारताची आर्थिक प्रगती, जागतिक हवामान, अंतराळ, उपग्रह या विषयावर कोणीही मांडलेल्या मताला Like, comments, share करतात ? म्हणजे अनुक्रमे सहमत असतात ? मत मांडतात ? पसरवतात ??
यातील बऱ्याच जणांची Like, Comments, Share ची स्पेलिंगसुद्धा आत्ता पाठ झाली असेल!!
हेच एक आपल्याला छान जमतं. दुसऱ्याला चिडवणं, वेड्यात काढणं, एकदम कस्पटासमान लेखणं. एके काळी स्वत:च्या फोटोपुरता मर्यादित असलेला Social Media आज केवळ खिल्ली उडवण्यासाठी वापरला जातोय.
मी, तुम्ही, आपण करत असलेल्या याच गोष्टींचा फायदा नकळत दुसऱ्याला करून देतो असं नाही वाटत ? ( माझं स्वत:चं Facebook Page आहे. त्याद्वारे माझ्या पुस्तकाचे नाव लोकांना माहीत व्हावे नि त्यांनी ते विकत घेऊन वाचावे नि अभिप्राय द्यावा हा हेतू. पण त्याआधारे माझ्या जातीतल्या रीतीच योग्य, माझ्याच धर्मातील प्रथा श्रेष्ठ, माझ्याच भाषेतील काव्य-साहित्य महान, माझं राज्य महाराज्य असा प्रचार केला तर ?)
एखाद्या व्यक्तीला, संस्थेला मोठं व्हायचं असेल तर Social Mediaचा नि आपला वापर केला जातोय हे आपल्याला कळलं आहे का ?
Social Media न वापरता माणसं जोडलेले नि महान झालेले अनेक महापुरुष आपल्याला माहीत आहेत. आपण काय करतो ? तर इतिहासातील त्याच महापुरुषांच्या चुका काढतो? त्याच्याशी जोडलेल्या व्यक्तींना देशविरोधी नि त्याच महापुरूषांच्या विरोधकांना देशभक्त ठरवतो ?
या महान व्यक्तींच नाव त्यांचा जन्म झालेल्या राज्यात केवळ भाषण करताना घ्यायचं, केवळ त्याच राज्यात पुतळा बांधायचा आणि वास्तूंना नाव दिलं की गरजेची कामं न करता Social Mediaचा वापर करून स्वत:ला 'आभासी महात्मा' बनवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हे खुप सोप्पं आहे. सामान्य माणसाला एखाद्या सेलिब्रिटी सोबत फोटो काढला की आपल्याला मोठेपणा मिळतो तसंच महान व्हायचं असेल तर जिवंत असलेल्या कर्तुत्ववान व्यक्तींचा सत्कार केला नि हयात नसलेल्यांचे मोठ्यात मोठे नि जास्तीत जास्त स्मारक केले की या सर्वांपेक्षा महान होता येतं. बाकी Social Media आहेच. ंं मुख्य कामं करण्याची गरजच काय ?
सध्या एखाद्या विषयावर आपली मतं ही त्या विषयावरची पोस्ट वारंवार पाहून होत आहेत. तुम्ही 'दृश्यम' चित्रपट पाहिलाय का ?
एखादी काल्पनिक गोष्ट वारंवार पाहिली की तीच खरी वाटू लागते. तसंच काहीसं होतंय आणि आपण कायदा-सुव्यवस्था कशी आणायची, देशाचा जीडीपी कसा वाढेल, काश्मीर प्रश्र्न कसा सुटेल, पृथ्वीची काळजी कशी घ्यायची , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जवानांची काळजी, तिसरं महायुद्ध या विषयावर मत प्रकट करतो ? आणि त्यानुसार जगाचा कारभार चालतो असं वाटतं ??
एकंदर .... विचार न करता व्यक्त होण्याच्या आपल्या सवयीमुळे आपलं नुकसान होतंय. दुसऱ्याने मांडलेलं नि नीट वाचता येईल असं रंगकाम केलेलं एका वाक्यातलं मत Like केलं की तेच आपलं मत. मग त्याच प्रकारातलं मत मांडायला प्रोत्साहन मिळतं, comments केले की वादविवाद ते शिव्या हा प्रवास होतो, नि Share केलं की छान प्रचार होतो. यात आपलं स्वतःचं मत कुठेय ? त्यासाठी वेळ कुठेय ? पुढे लगेच भलत्याच विषयाची पोस्टसुद्धा बघायची आहे की !
आपला मोबाईल, वेळ, हाताची बोटं, बोटांचा स्पर्श, मेंदू दुसऱ्याच्या प्रगतीसाठी झाला तर ठीक पण सोबत स्वत:ची विचार करून कृती करायची क्षमता कमी होतेय, आपण दुसऱ्याच्या नजरेतून जग पाहतोय असं नाही वाटत ?
अजून काही मराठी लेख :
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
Likes Comments आणि Share
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: