जरूर वाचावं असं पुस्तक: हे आर्थिक श्रीमंती म्हणजे काय हे सांगतं नि त्यासंबंधी मार्गदर्शन करतं
Marathi Blog - मनात आलं म्हणून
आर्थिक श्रीमंतीचं मार्गदर्शन
या पुस्तकाची माहिती खरंतर आधीच द्यायला हवी होती पण मीसुद्धा हे पुस्तक आत्ताच ( नि खरंच उशिरा) वाचलं. पुस्तक वाचून कृती करून फायदा होण्यास वेळ लागेल पण 'फायदा' नक्की होईल.
क्षेत्र कोणतीहं असो, प्रगती सर्वांना हवी असते पण त्या प्रगतीने आर्थिक श्रीमंती येईलच नि असलेली आर्थिक श्रीमंती कशी टिकेलच याबद्दल अनेकांना ज्ञान नाही. म्हणून हे मराठीत भाषांतर केलेले पुस्तक वाचावे.
सुुंदर अक्षर हाच दागिना, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार, आरोग्यम् धनसंपदा, जिद्द हीच खरी दौलत अशी वाक्य आपल्या मनात खोलवर रुजलेली आहेत. प्रत्यक्ष खरेदी करताना यातलं काही कामाला येत नाही. म्हणून हे पुस्तक.
स्पष्टपणे .... 'आर्थिक श्रीमंती' कशी मिळवता येते या प्रश्नापासून अनेकजण फार दूर आहेत. म्हणून हे पुस्तक.
व्यवहाराविषयी, पैशांविषयी बोलताना किंवा कृती करताना आपल्याला स्वार्थी, लोभी, कंजूस, लबाड, हावरा अशी नकारार्थी विशेषणे लागतील असं स्वत:च स्वत:वर एक दडपण केलेलं आहे. आपल्याला गुंतवणूक, कर्ज, व्याज, उलाढाल, परतफेड या मुळात महत्त्वाच्या गोष्टींचं ज्ञान नाही. आपल्यापैकी बरेचजण 'आर्थिक साक्षर' नाहीत. म्हणून हे पुस्तक.
हे पुस्तक पैसे मिळवण्याबाबत मार्गदर्शन करण्याआधी मेंदूवरची धूळ काढतं. मग तुम्हाला उदाहरणं देत मार्ग दाखवतं. या मार्गात नोकरी / व्यवसाय करत असताना जाणवणारी स्पर्धा , चढाओढ, मत्सर, भय हा प्रकार नाही.
'आर्थिक स्वातंत्र्या'साठी हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळात आर्थिक समस्या वाढण्याची, पैशांची चणचण भासण्याची शक्यता आहे असं वाटत असेल तर स्वत:च्या फायद्यासाठी नि आपल्या पुढील पिढीसाठी 'Rich Dad Poor Dad' हे पुस्तक आवर्जून वाचा.
पुस्तक विकत घेतलं की ते गंभीरतेने नि पूर्ण वाचलं जातं. हे पुस्तक विकत घेणं ही खरेदी नसून गुंतवणूक आहे.
पुस्तक विकत घेतलं की ते गंभीरतेने नि पूर्ण वाचलं जातं. हे पुस्तक विकत घेणं ही खरेदी नसून गुंतवणूक आहे.
पुस्तक मुखपृष्ट |
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
Rich Dad Poor Dad
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: