प्रणवीर महाराणा प्रताप - डॉ. भारती सुदामे. (पुस्तकाविषयी मत) : मराठी भाषा किती समृद्ध आहे , एखाद्या इतिहासपुरुषावर आधारित पुस्तक कसं असावं याचं उत्तम उदाहरण
Marathi Blog - मनात आलं म्हणून
प्रणवीर महाराणा प्रताप
प्रणवीर महाराणा प्रताप |
पुस्तक वाचनाचा आनंद सांगताना काही पुस्तकांची नावं उदाहरण म्हणून दिली जातात. माझ्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत आता ह्या पुस्तकाचा समावेश झाला नि काहीतरी जिंकल्याचा आनंद होतोय. पुस्तकातलं एक-एक पान, त्यातील अनेक परिछेद, वाक्य पुन: पुन्हा वाचावीशी वाटली. फार भारावून जाऊन या पुस्तकाबद्दल सांगतोय.
अहाहा! काय ती भाषा ! काय ती लिखाणाची शैली ! काय तो समानार्थी शब्दांनी शृंगारलेले सुविचार ! मराठी भाषेची समृद्धी म्हणजे काय हे सांगण्यासाठी या पुस्तकाचा उल्लेख जरूर करावा.
आता थोडं पुस्तकाबद्दल.
महाराणा प्रताप हे शाळेत अगदी बालवाडी पासून झालेलं ( नि फक्त त्याच्या चेतक घोड्याचं नाव ऐकलेलं ) व्यक्तिमत्त्व या पुस्तकामुळे प्रेरणास्थान बनू शकतं. त्यांचे पूर्वज, घराणे, साथीदार, सरदार, जनता, हेरखाते, चेतक, शत्रू अकबर यांच्या कहाण्या वेगवेगळ्या काळात घडलेल्या असलेल्या तरीही त्या एकमेकांत लीलया गुंफल्या आहेत. तेंव्हाचा तिथला निसर्ग, लोकांचे पेहराव, सण, किल्ले यांचं वर्णन वाचून, नकाशे पाहून आता राजस्थानला जाऊन डोळस प्रवास करायची तीव्र इच्छा झालीय. मीराबाई हत्या महाराणा प्रताप यांच्या काकी होत्या हे मला नुकतंच कळलंय. सम्राट अकबराला जरी आपण सम्राट असे संबोधित असलो तरीही त्याला शरण न जाता, राष्ट्राभिमान जागं ठेवत युद्ध करणारा, त्याचवेळी रयतेला युद्धाची झळ बसू न देणारा, चौफेर दृष्टी नि दूरदृष्टी असलेला , नीतिमान , चारित्र्यवान आणि पुस्तकाच्या नावाप्रमाणे प्रणवीर असे अनेक गूण त्यांच्यात आढळतात. अकबराचे ( चित्रपटात न दाखवलेले) दुर्गुण फार खालच्या थरातले होते ( आपण त्याला हृतिक समजून चूक केली.)
महाराणा प्रताप यांच्या काळात इतिहास लेखक / संशोधक होते त्यामुळे तो जास्तीत जास्त खरा असावा. तो एकदा माहीत झाला की पुस्तकातील इतर वाक्ये मोलाचं तत्त्वज्ञान सांगतात.
महाराणा प्रताप यांना आदरांजली, लेखिकेचे मनापासून आभार पण हे पुस्तक निवडून वाचलं यात स्वत:चंही कौतुक!
अधिक वाचा
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
प्रणवीर महाराणा प्रताप
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: