भाषेची भिंत

काही दिवस चेन्नईला होतो. तिथे कुणालाच हिंदी येत नाही असं वाटतं आणि येत असूनही कुणी बोलत नाही शिकायची इच्छा नाही असं वाटलं. तो अनुभव.....

भाषेची भिंत

marathi blog on expression while speaking with person with another language

तिथे जाण्याची ही पहिलीच वेळ. तिथल्या लोकांना हिंदी येत नाही असं ऐकून होतो त्यामुळे इंग्रजी बोलावं लागेल हे स्पष्ट होतं. पण ते केवळ कामापुरता.

कुणालाही / सरकारी कामगारालाही काही हिंदी  किंवा इंग्रजी मध्ये विचारलं तर आधी तमिळमध्ये उत्तर मिळायचं  नंतर तुटक इंग्रजीमध्ये. तुमचा इन्चार्ज कुठे आहे असं विचारलं तर "नो इन्चार्ज only तमिल" असे चमत्कारिक उत्तर मिळाले. तामिळ येत नाही असं सांगितल्यावर तर काहीच मदत मिळायची नाही.
कोणतंही  काम करताना पुन्हा पुन्हा भाषेची अडचण यायची;  तर कायमस्वरूपी नोकरी करण्याचा विचार तर दूरच राहिला. त्यांनी एक मजबूत भिंत बनवली आहे ....भाषेची.  साधी साधी कामे करताना वैताग येतो. ते  खुप छान इडली, डोसा, मेदुवडा,डाळ वडा, म्हैसूरपाक, रसम, कॉफी बनवतात.भात उत्कृष्ट गुणवत्तेचा असतो पण त्यांना चपाती नीट बनवता येत नाही असं वाटायचं.  काही हॉटेलात तर स्पेशल थाळी मध्येच चपाती मिळाली. जसे त्यांचे पदार्थ मुंबईत  जितक्या सहज मिळतात तितक्या सहज वडापाव, कांदेपोहे, ढोकळा, इतर राज्यातले पदार्थ तिथे दिसले नाहीत. जेवणाची ऑर्डर देताना समजावून  सांगावं लागतं.

  एका म्युझियममध्ये गांधीजी हे एकच ओळखीचे स्वातंत्र्यसैनिक होते. बाकी सर्व दक्षिणेतीलच होते. हा गैरसमज नाही. गैरसमज असेल तर तो बाहेर लावलेल्या तमिळ भाषेतील फलकांमुळेच कारण तेच फलक इंग्रजी भाषेत नाहीत. भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या क्रिकेट सामन्याचं समालोचन तिथे वेगळ्या वाहिनीवर तमिळ भाषेत होतं. आमिर खानचा 'सीक्रेट सुपरस्टार' किंवा अजय देवगणचा 'गोलमाल -४ ' यापैकी कोणत्याही हिंदी चित्रपटाची जाहिरात मी पाहिली नाही. सरकारी ऑफिसात हिंदी शब्द परिचय व्हावा म्हणून बोर्डवर एक हिंदी शब्द लिहिलेला असायचा. आठवडाभर एकच शब्द होता....'जागरूक'.
marathi blog on quarrel between two person

तिथे ओला टॅक्सी  बोलवली तर आधी त्यांना नीट समजावून सांगावं लागायचं,नाहीतर शेजारी कोणी इंग्रजी समजणारा सापडला तर त्याला तामिळमध्ये  टॅक्सीचालकाशी बोलायला सांगावं लागलं. तिथे बरीच तमिळ आणि इंग्रजी वर्तमानपत्रे आहेत एखादंच हिंदी वर्तमानपञ आहे. मुंबईत जशी सर्व भाषेच्या वर्तमानपत्रांची दुकानं दिसतात तशी इतर कुठे दिसतात ? ओला टॅक्सी मध्ये गाणी ऐकावीशी वाटली तर रेडिओवर 6 वाहिन्या या तामिळ भाषेतल्या गाण्यांसाठी होत्या! हिंदी गाणे चालू असलेली वाहिनी मिळाली नाही.

हे असे बोलतात की जणू समोरच्याला  तमिळ व्यवस्थित येतं. कोणत्याही दुसरा भाषिकांशी न भांडता त्यांनी स्वतःच्या राज्यात स्वतःची संस्कृती, स्वतःची नोकरी व्यवस्थित सांभाळली आहे आणि व्यवसाय करायचा असेल तर ते मुंबई /दुबई/ सिंगापूर अशी ठिकाणे निवडतात. शहरात आलेल्या अशा लोकांना पाहून आपल्याला असं वाटतं की हे खूप प्रगत आहेत आणि त्यांच्या प्रगतीचं कारण इंग्रजी भाषा आहे पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. उदाहरण म्हणजे आजही तिथे भविष्य सांगण्यासाठी पोपट बाहेर येतात . रस्त्याच्या किनारी उघडपणे दारू विकली जाते आणि त्यासाठी रांगा लागतात !! विषयांतर नको. त्यांची भाषा सोडून इतर भाषीय त्यांना आपलेसे नाही वाटत आणि हे त्यांच्या बोलण्यातून; म्हणजे न बोलण्यामुळे जाणवलं.

मराठी माणसाचं काय चुकतं ? तो तमिळ माणसासारखा वागला तर मात्र तो संकुचित विचारांचा आहे असा ठपका लागतो ? आपल्याकडे मराठी राजभाषेचा मुद्दा आहे हेच दुःख आहे आणि एखाद्या पक्षाचा तो मुद्दा आहे सर्व मराठी भाषिकांचा नाही हे मोठं दुःखं आहे. आधी मराठी माणसालाच समजवावं लागतं. आपण मराठी माणसंच चांगली, भोळी की मूर्ख आहोत हे कळत नाही पण आपण पाहूणचार तमिळ लोकांसारखा करावा म्हणजे पाहुणचार करूच नये (असं वागावं की कुणाशी भांडणही होणार नाही आणि आपण कुणाला आवडणारही नाही ) आणि  हा उपाय तमिळनाडूमध्ये जाऊन मिळाला. एक वेगळ्या प्रकारचं असहकार आंदोलन आपोआपच अनुभवायला मिळालं.

त्यांच्यावर टीका करण्याचा हेतू असता तर इंग्रजीत लिहीला असता पण काहीतरी शिकण्याची गरज मराठी माणसाला आहे.काही सुधारता आलं तर स्वतःपासून सुरूवात करू.
marathi blog on language barrier


अधिक वाचा 

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
भाषेची भिंत भाषेची भिंत Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

4 comments:

  1. हा कोणत्या वर्षीचा अनुभव आहे ते माहिती नाही. मी अनेकदा तामिळनाडूत गेले आहे आणि माझा अनुभव इतका वाईट नाहीये. भाषा मुख्यत्वे संवादाचं माध्यम आहे. तामिळ लोकही चांगलं सहकार्य करतात. पुढच्यावेळी जाल तेव्हा 'वणक्कम', 'कुंचम्' 'तामिळ तेरियाद' असे काही शब्द शिकून जा. तामिळ गाणी ऐका, चित्रपट पाहा. सीएसकेवर चर्चा करा. मजा येईल. तिथल्यासारखी इडली जगात कुठं मिळत नाही. (बाकी बहुसंख्य मराठी लोक हिंदी चांगलं बोलतात हा मराठी लोकांचा एक गोड गैरसमज आहे. पण आधी म्हटलं होतं तेच - संवाद होण्याशी मतलब!)

    ReplyDelete
    Replies
    1. छान. तामिळनाडूमध्ये किंवा कुठल्याही राज्यात जाताना असे शब्द वापरावेत आणि वापरले जातातसुद्धा. आपलं काम साधण्यासाठी परराज्यात, परराष्ट्रात त्यांच्या भाषेत बोलले की आपले काम थोडे सोपे होते. याच कृती मराठी भाषेसाठी महाराष्ट्रात मराठी माणसाने केल्या तर 'संकुचित' हे विशेषण लागते. (आपण हा लेख फेसबूकद्वारे पाहिला असल्याचे नि त्यासोबत लिहिलेले वाक्य वाचल्याचे गृहीत धरतो.) तिथे जाऊन तामिळ चित्रपट पहा, गाणी, सीएसके वगैरे सल्ले तामिळ भाषिक महाराष्ट्रात आल्यावर पाळतील असं वाटत नाही. मराठी लोक हिंदी चांगलं बोलत नाहीत. ते चांगलं हिंदी चांगलं बोलेपर्यंत इतर भाषिकांनी मराठीत बोलण्यासाठी साधे प्रयत्नही करू नयेत. मराठी भाषिक हिंदीत बोलण्याचा किमान प्रयत्न फार आधीच सुरू करतात. तामिळ भाषिक तर थेट दुर्लक्ष करतात असा अनुभव प्रस्तुत लेखात दिला आहे. संवाद होण्याशी मतलब हा मुद्दा बरोबर आहे पण मूल विषय हा मातृभाषेची जोपासना हा आहे. मराठी भाषिक दुसर्‍याच्या मातृभाषेचीही जोपासना करताना दिसतो पण इतर भाषिक मराठी भाषिकांना सल्ले देतात. हा कोणत्या वर्षीचा अनुभव आहे हे सहज ओळखता येईल.
      तुमचे मत मांडल्याबद्दल धन्यवाद.

      Delete
    2. मराठी लोक हिंदी चांगलं बोलत नाहीत. ते चांगलं हिंदी चांगलं बोलेपर्यंत इतर भाषिकांनी मराठीत बोलण्यासाठी साधे प्रयत्नही करू नयेत ?? (उत्तर देताना प्रश्नचिन्ह राहिले होते).

      Delete
    3. धन्यवाद.

      Delete

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.