मराठी राजभाषा दिन - २७ फेब्रुवारी: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !!! पण त्यासाठी मराठी भाषेसाठी काहीतरी योगदान हवं.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
मराठी राजभाषा दिन
जोंधळे महाविद्यालयातील रांगोळी |
पण कोणाला ?
मराठीत बोलणार्या सर्व भाषिकांना.....
मराठी लेख, कविता, कथा,संवाद, एकांकिका ,नाटक ,चित्रपट , गाणी,जाहिराती,मालिका , पुस्तकं आणि ब्लॉग लिहिणार्या सर्व लेखकांना.....
मराठी पुस्तकं,वर्तमानपत्रं वाचणार्यांना, प्रकाशकांना, बातम्या मराठीत पाहिल्या तरच स्पष्ट कळणार्यांना.....
आकाशवाणीवर मराठी गाणी ऐकणार्यांना, कधी काळी क्रिकेटचं समालोचन ऐकलं होतं , त्यांना.
मराठी गाणी मोबाईलमध्ये जपून ठेवणार्यांना, गाण्याच्या भेंड्या खेळताना मराठी गाणं गाणार्यांना,
मराठी खेळाडू, कलाकार, राजकरणी, साहित्यिक, व्यावसायिक यांना प्रोत्साहन देणार्यांना.....
डिस्कव्हरी , कार्टून, खेळ, व्यवसाय यांसाठी स्वतंत्र वाहिनी नसल्याची ( माझ्याप्रमाणे ) खंत असलेल्यांना......
मराठीत बहुतेकदा काम करताना दिसणार्या मराठी कलाकारांना अाणि अधूनमधून मराठीत काम करणार्या इतर भाषेतील कलाकारांना. ही काम देणार्यांना.....
मराठीत बोलताना इंग्रजी शब्द जास्त येत अाहेत याची जाणीव असणार्यांना......
मराठीसाठी मराठीत वाद लावणार्यांना, वाद घालणार्यांना, त्यांच्यावर मराठीत विनोद करणार्यांना.......
इतर भाषिक असूनही मराठीचा आदर करणार्यांना...
मराठी साहित्य या विषयावर अभ्यास करणार्यांना...मराठी शाळांना, मराठी शाळेत प्रवेश करून देणार्या पालकांना,,,,
आठवणी मराठी भाषेत येत असतील तर मातृभाषा मराठी आहे हे समजलेल्यांना .....
इतर भारतीय भाषा आणि भाषिकांना न दुखवणार्यांना.....
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 25, 2020
Rating:
No comments: