आउट ऑफ द् बॅाक्स: भावलेलं , दिसलेलं आणि त्या पलिकडचं .- लेखक :हर्षा भोगले अनुवाद :चंद्रशेखर कुलकर्णी ( पुस्तकाविषयी मत )
Marathi Blog - मनात आलं म्हणून
पुस्तकाच्या गाभ्याला समर्पक असं पुस्तकाचं हे नाव. हर्षा भोगले यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह. आपल्याला क्रिकेट,क्रिकेटपटू , व्यवस्थापन आणि जगावर होणारा त्याचा परिणाम यांबद्दल विचार करायला लावतो. आपण कधी काळी केलेली टीका किती कमी विचार करत केली होती हे पुस्तक वाचताना जाणवेल. ट्वेंटी -२०,एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांचं त्यांनी केलेलं विश्लेषण हे आपण जिंकताना काय हरलो आणि हरताना काय जिंकलो याची द्दष्टी मिळते.
सचिन तेंडुलकर ,सेहवाग,गांगुली,द्रविड,वॉर्न,इंझमाम,लारा,धोनी ,झहीर ,कुंबळे, जयसुर्या, या आणि अशा अनेक खेळाडूंबद्दल वाचताना जुन्या आठवणी जाग्या होतात. त्यांच्या खेळातले सूक्ष्म निरीक्षण वाचनीय आहे. अनेक वादांवर देखील पडदा पाडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला दिसतो.
एका ठराविक काळातल्या घटनांचा संदर्भ असला तरी खेळ कसा पहावा आणि टिप्पणी कशी असावी हे पुस्तक वाचूनच कळेल. विशेष म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आहे.
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
आऊट ऑफ द बॉक्स
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: