५ कारणे - गिर्यारोहकासाठी पुस्तक

सुळक्याकडून सुळक्यांकडे हे केवळ पुस्तक नसून कठीण सुळके सर करू इच्छिणार्‍या खेळाडूंसाठी एक गुरू, मित्र, स्पर्धक, सोबती, डॉक्टर आणि बरंच काही आहे. या पुस्तकाविषयी... लेखक - अशोक पवार- पाटील.

प्रस्तरारोहण  

marathi blog on book for rock climbing
पुस्तक मुखपृष्ठ 
हे पुस्तक कोणत्याही कथेचं नाही तर ज्यांना आयुष्यात अनेक कथा, इतिहास घडवायच्या असतील तर अशा गिर्यारोहणच्या संघाने एक (किंवा अनेक) दिवस या पुस्तकाच्या आकलनासाठी, अपघात टाळण्यासाठी आणि अपघात घडल्यास त्यातून बाहेर येण्यासाठी जरूर वाचावे.

गड किल्ल्यांबद्दल वाचलं ,त्यांची चित्रे पाहिली  की गडांना प्रत्यक्ष पहावंसं वाटतं. मग गडमाथ्यावर पोहोचण्याची इच्छा होते. मग व्यक्त करता येत नाही असे फायदे व्यक्तिमत्त्वात घडतात आणि स्वतःला एक गोड व्यसन लागतं. पदभ्रमणाचं ( Trekचं)

अनेक गडमाथ्यांवर एका टप्प्यापर्यंत पदभ्रमण (Trek) करता येतं पण गडांची उंची गाठता येत नाही. कारण इथून पुढे प्रस्तरारोहण करणं हा एकमेव पर्याय उरतो. आणि ह्याच प्रस्तरारोहणासाठी हे  पुस्तक .

लेखकाने स्वत: १५० सुळके सर करून, ६०फूट खाली पडल्याने हाडं मोडूनही पुन्हा प्रस्तरारोहण करून आणि प्रचंड अभ्यास करून गिर्यारोहक , त्यांचे संघ, प्रशिक्षक, प्रथमोपचार करणारे, सुरक्षा आणि प्रस्तरारोहणाचे साहित्य पुरवणारे यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक ( गाईड ) उपलब्ध केले आहे.
marathi blog on book on rock climbing
पुस्तक मलपृष्ठ 

पुस्तकात महत्त्वाचं काय मिळेल ?

१.  एक खेळ नि व्यायाम म्हणून प्रस्तरारोहण (Rock Climbing) कडे पाहण्याचा दृष्टीकोन खेळाडूंमध्ये तयार झाला की अधिकाधिक शास्त्रीय पद्धतीने खेळ पार पडावा हा हेतू या पुस्तकाने साधी होईल. Trek एकट्याने करता येतो पण प्रस्तरारोहण (Rock Climbing) मात्र सांघिक खेळ आहे. त्यात चढाई करणारा जरी एक असला तरी चढाई न करणारे सुद्धा संघात महत्त्वाचे असतात. त्यामुळे हा खेळ जो खेळू शकत नाहीत त्यांनाही यात सहभागी होता येतं हे समजतं. 

२. पुस्तकाच्या सुरूवातीला गिर्यारोहण (Mountaineering), पद्भ्रमण म्हणजे काय, कशासाठी हा अट्टहास याबद्दल सांगून पुढे   प्रस्तरारोहण (Rock Climbing) करताना वापरले जाणारे महत्त्वाचे अनेक तांत्रिक शब्द व त्याचा अर्थ दिला आहे. प्रत्यक्ष प्रस्तरारोहणची (Rock Climbing) करताना ते शब्द सतत वापरले जातात. अनेक छोटी-मोठी महत्त्वाची हत्यारे, त्यांचा उपयोग कसा करावा याचे तपशील वाचकाला माहीत होतात तर खेळाडूंना समजतात. 

३. प्रस्तरारोहण (Rock Climbing) साठी लागणारा दोरा (rope) याबद्दल इतकी विस्तृत नि महत्त्वाची माहिती क्वचितच वाचायला मिळते, दोरीच्या गाठी, प्रत्यक्ष प्रस्तरारोहण (Rock Climbing) करताना घेतल्या जाणार्‍या मुद्रा चित्रांसहित दिल्याने त्या नीट समजतात किंवा खेळाडूंना त्यांच्या चुका सुधारता येतात. 

४. या पुस्तकात नि या खेळात प्रथमोपचाराचं महत्त्व जास्त आहे नि त्यामुळे पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरण दिले आहे. जे सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींना उपयोगी ठरेल. 

५. पुस्तकाचा दुसरा भाग हा १५० हून अधिक सुळक्यांची तपशिलवार माहिती देतो. नवरा, नवरी, भटोबा, करवली, घोडा, बाहुली , वाजंत्री, गुळाची ढेप,  हॉट डॉग, वजीर, शेंडी ,बाण, रॉकेट, गंभीर , पेन अशी सुळक्यांची नावं धमाल आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक सुळक्यांची उंची, प्रत्यक्ष चढाईची उंची, सुळका सर करण्यासाठी लागू शकणारा वेळ, त्याची  (सोपी / अवघड ) श्रेणी, पाणी मिळण्याची जागा ही माहिती ज्ञानात भर टाकते. 

यापेक्षा जास्त कारणे पुस्तक वाचणार्‍या नि गिर्यारोहण करणार्‍या खेळाडूला जाणवू शकतात. 

टीप: 

  •        केवळ पुस्तक वाचून थेट गिर्यारोहण करू नये.
  •        हे पुस्तक एकाच गटात अनेक खेळाडूंनी वाचल्यास उत्तम ठरेल.


मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
५ कारणे - गिर्यारोहकासाठी पुस्तक ५ कारणे - गिर्यारोहकासाठी पुस्तक Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

2 comments:

  1. सर हे पुस्तक कुठे भेटेल

    ReplyDelete
    Replies
    1. मला संपर्क करा. ९८१९६६३६३०
      (ज्यांच्याकडे पुस्तक मिळेल त्यांचा संपर्क क्रमांक थेट ब्लॉगवर लिहिणे उचित ठरले नसते म्हणून लिहिला नाही. )

      Delete

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.