घर आणि ऑफिसमधील हवेची गुणवत्ता

बाहेर जरी वायू प्रदूषण होत असले तरी ते घरात शिरता कामा नये. हे शक्य  आहे. दक्षिण कोरियात  TN Solutions या कंपनीने Nano Fiber Mesh ही एक नवीन जाळी अस्तित्वात आणली आहे. नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ही जाळी बाहेरून आत येणारी हवा शुद्ध करते. या जाळीतून हवा आरपार जाऊ शकते पण बाहेरील प्रदूषण खोलीत आत शिरून आतील हवा प्रदूषित होत नाही. ही जाळी हवेतील सूक्ष्मकण , ऍलर्जी होऊ शकते असे हवेतील घटक, परागकण, डोळ्यांनी पाहू शकत नाही अशा कणांनासुद्धा अटकाव करते. सोबतच अतिनील  (यूव्ही) किरण, जीवाणू आणि पाण्याचे थेंबही जाळीतून पुढे जात नाही. याव्यतिरिक्त, जाळीमुळे बाहेरून येणारी उष्णता 50% ने कमी होते. ती जाळी खिडक्यांना लावण्यास आणि साफसफाईसाठी अतिशय सोपी आहे. ज्या रोगांची कल्पना आपल्याला त्या रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होत नाही, ज्याची लक्षणे दिसत नाही अशा विविध हानिकारक आपण आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो. चला, या Nano Fiber Mesh बद्दल अधिक माहिती घेऊया.

घरातील हवेची गुणवत्ता
सुधारण्यासाठी 'Nano Fiber Mesh'

घरातील हवेची गुणवत्ता महत्त्वाची का असते?

याचे उत्तर घेताना आपण आधी श्वासोच्छवासाबद्दल थोडी माहिती घेऊ.

मनुष्य आणि इतर प्राणी श्वासोच्छवास ही एक अतिशय महत्वाची क्रिया सतत करतात. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण श्वासोच्छवास करतात. माणूस दिवसातून सरासरी २२,००० वेळा श्वास घेतो!!! विश्रांतीच्या वेळी प्रौढ व्यक्तीचा सामान्य श्वसन दर 12 ते 18 श्वास प्रतिमिनिट असतोविश्रांती घेताना श्वसनाचा दर प्रतिमिनिट 12 पेक्षा कमी किंवा 25 पेक्षा  जास्त  असेल तर ते खालावलेल्या प्रकृतीचे लक्षण असू शकते. अस्थमाच्या तीव्र झटक्यामध्ये रुग्णाचा श्वासोच्छवासाचा दर 20-30 श्वास प्रतिमिनिटापर्यंत वाढू शकतो. व्यायामादरम्यान, श्वासोच्छवास 40-60 श्वास प्रतिमिनिटापर्यंत वाढू शकतो

Respiration Rate Table
मानवी श्वसनाचा प्रतिमिनिट वेग 

म्हणून, श्वासोच्छवास ही सर्वात महत्वाची क्रिया आहे. माणूस, प्राणी पाणी पितात आणि अन्न खातातपण श्वासोच्छ्वास हा नकळत होत असतो. पाणी आणि अन्नाशिवाय मानव काही दिवस जगू शकतो परंतु श्वासोच्छवासाशिवाय काही मिनिटेच राहू शकतो.

v  माणसाभोवती शुद्ध हवा का असली पाहिजे ?

  • आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असावे म्हणून
  • इमारतीमध्ये जितकी वीज किंवा ऊर्जा वापरली जाते आणि जितकी वाचवण्याचा प्रयत्न होतो त्यापेक्षा आतील एकेक सजीवाचे महत्त्व हे नेहमी जास्त आहे.
  • बाहेरील ( शुद्ध) हवा इमारती नि घरांमध्ये येणं हे आरोग्यासाठी लाभदायक असतं . शुद्ध नि ताजी हवा मिसळल्याने घरात असलेल्या प्रदूषण करणाऱ्या घटकांचा परिणाम कमी होत राहतो.

 

घरातील हवा बाहेरच्या हवेपेक्षा वाईट असते ?

घर, ऑफिस, हॉटेल, शाळा, दुकाने, मॉल्स इत्यादी ठिकाणी मिळून माणूस स्वतः;चे सरासरी 90% आयुष्य व्यतीत करत असतो. असे अभ्यासातून समोर आले आहे. अनेकदा आपण प्रवास करत असताना वायू प्रदूषणाची तक्रार करत असतो. बाहेरच्या हवेच्या दूषिततेबद्दल तक्रार ही योग्यच आहे. वाहने, कारखाने, बांधकाम, फटाके इत्यादींमुळे बाहेरची हवा प्रदूषित होत असते, तीच हवा घरातील हवेत मिसळते. या घरातील हवेमध्ये प्रदूषण होईल असे आणखी काही स्रोत असतात. स्वयंपाक, धुम्रपान, साफसफाई, पाळीव प्राणी, बाष्प, अत्तर, सुवासिक नि  जंतूनाशक फवारण्या, रंग आणि इतर अनेक प्रदूषणाचे स्रोत घरातही असतातहवा खेळती राहण्यासाठी नसलेली सोया आणि कमी जागेत तुलनेने जास्त लोकांचा वावर यामुळे घरातील वायू प्रदूषणाची तीव्रता वाढते. माणसाच्या  श्वासोच्छ्वासातून आणि स्वयंपाकामुळे घरातील हवेत कार्बन वाढत असतो. साफसफाईमुळे हवेत धूलिकण काही काळ हवेत तरंगत राहतात.
या आणि अनेक कारणांमुळे घरातील हवा बाहेरील हवेपेक्षा - पट अधिक प्रदूषित असते. 

Common Indoor Air Pollutants
सर्वसामान्यपणे घरात आढळणारे हवा प्रदूषित करणारे घटक 

वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम:

घरातील वायू प्रदूषणाचा परिणाम लगेच जाणवत नाही. त्यामुळे कोणत्याही आजाराची लक्षणे दिसू लागल्याशिवाय ते जाणवू शकत नाही.  घरातील प्रदूषकांचे आरोग्यावर होणारे परिणाम  त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर लगेचच किंवा शक्यतो वर्षांनंतर जाणवू शकतात. त्वरित दिसणारे काही परिणाम सहसा अल्पकाळ टिकणारे आणि उपचार करण्यायोग्य असतात. घरातील वायू प्रदूषकांच्या संपर्कात अल्प प्रमाणात परंतु दीर्घकाळ राहिल्याने आरोग्यास निर्माण होणारा  धोका कायमस्वरूपी राहू शकतो.

वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम:

हवेच्या खराब गुणवत्तेमुळे प्रामुख्याने कोणावर परिणाम होतो ?
1. वातानुकूलित कार्यालयातील लोक,
2. दीर्घ कालावधीसाठी स्वयंपाकगृहात असलेले लोक, आणि 

3. कारखान्यांमधील कामगार 



Understanding Nano Size
नॅनो आकार समजून घेताना 

घरातील हवेच्या खराब गुणवत्तेमुळे त्वचाफुफ्फुसेमेंदूहृदयडोळेघसानाक इत्यादींवर परिणाम होऊ शकतोहे ज्या कणांमुळे होते ज्याला पार्टिक्युलेट मॅटर असेही म्हणतातपार्टिक्युलेट मॅटर (PMहे लहान स्थायू किंवा द्रव थेंबांचे मिश्रण असते ज्यामध्ये धूरकाजळीघाण आणि हवेत तरंगणारी धूळ यांचा समावेश असतो.PM10 आकाराचे ( तुलनेने मोठेकण तुमचे डोळेघसा आणि नाकाला त्रास देऊ शकताततर PM2.5 आकाराचे सूक्ष्म  कण अतिधोकादायक असतात कारण त्यांची जाणीव  होता ते आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतातएका संशोधनानुसारघरगुती आणि घराबाहेरील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोक अकाली मृत्यूमुखी पडतात .  या मृत्यूंपैकी 19% क्रॉनिक COPD (फुफ्फुसाच्या वेगवेगळ्या समस्यांचा कळस), 21% निमोनियामुळे, 20% स्ट्रोकमुळे, 34% हृदयरोगामुळे,  आणि 7% फुफ्फुसाच्या कर्करोगाने होतात.लोक अनेक विषारी वायू आणि कणांच्या संपर्कात असतात.त्यामुळे त्यांच्या श्वसन कार्यावर परिणाम होत असतो आणि पुढे COPD सारख्या जोखीम असलेल्या रोगांचा सामना करावा लागतो

Diseases by Indoor air pollutant
खराब हवेमुळे शक्य असलेले रोग 

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) म्हणजे, फुफ्फुसात जाणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या हवेचे प्रमाण कमी होते.
खराब हवेमुळे न्यूमोनिया, काही प्रकारचे ताप आणि ब्राँकायटिससह श्वसनावर परिणाम करणाऱ्या समस्या उद्भवतात. .
मेंदूला होणारा रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे, ब्रेन स्ट्रोकची शक्यता असते ज्यावर त्वरित उपचार केल्यास व्यक्तीचे प्राण जाऊ शकतात.
हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास देखील धोका संभवतो.

A pyramid effect of Air pollution
खराब हवेचा मानवावर होणारा परिणाम

घरगुती वायू प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम होऊन आजारी पडल्याने कामाच्या ठिकाणी, शाळा किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गैरहजेरी वाढते. या नुकसानाचे पैशांत मोजमाप होऊ शकत नाही. खराब हवेमुळे  काम, अभ्यास करताना, खेळताना किंवा स्वयंपाक करताना एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
आता हे सर्व परिणाम माहीत झाल्यावर काय करावे ? जर घरातील हवेमुळे एखादा किंवा अनेक रोग होण्याची शक्यता आहे  तर आपल्याला आपल्या सभोवताली चांगली किंवा शुद्ध हवा पाहिजे, बरोबर? खोलीच्या आत केवळ शुद्ध हवेने प्रवेश केला पाहिजे पण प्रदूषणाचा शिरकाव होऊ नये, म्हणजे थोडक्यात काय हवेचे शुद्धीकरण झाले पाहिजे.
बाहेर जरी वायू प्रदूषण होत असले तरी ते घरात शिरता कामा नये.

यावर उपाय आहे.
दक्षिण कोरियामध्ये पेटंट केलेले Nano Fiber Mesh घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जगासाठी उपलब्ध आहे.

Nano Fiber Mesh एखाद्या  कपड्याप्रमाणे पातळ, 0.38 मिलीमीटर वजनाने हलकी जाळी आहे. फार ताणली तरीही ती फाटत नाही. हवा आरपार शिरताना ती हवेला उत्तम प्रकारे गाळते.  केवळ पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ करत ती बराच काळ टिकून राहते आणि गंजतही नाही.

Nano Fiber Mesh अतिनील (UV) आणि इन्फ्रारेड (IR) किरणांना अडवते ज्यामुळे हवेद्वारे येणारी ५०% पेक्षा कमी उष्णता आत शिरते. खिडक्यांमधील काचांप्रमाणे एअर कंडिशनवर असलेला हवेला थंड करण्याचा भार कमी करते. त्यामुळे विजेची बचत होते. 

Properties of Nano Fiber Mesh

हवेला शिरकाव करू देणारी जाळी, Nano Fiber Mesh आणि आधार देणारी अजून एक जाळी; अशा 3 थरांनी Nano Fiber Mesh बनलेली आहे . ती  99.9% हवा शुद्ध करते याचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या जाळ्यांमधून अतिसूक्ष्म कण जाऊ शकतात पण  Nano Fiber Mesh या सर्व कणांना जाळीत अडकवून ठेवतेपण दरवाजा उघडला तर दारातून हवा आत येऊ शकते आणि प्रदूषण करणारे घटक पुन्हा आतील स्वच्छ हवा प्रदूषित होऊ शकते असा प्रश्न पडू  शकतो. परंतु दार जितक्या वेळा उघडले जाते तितकासा वेळ हवा प्रदूषित करण्यासाठी फार कमी असतो. शिवाय आतल्या बाजूने , Nano Fiber Meshच्या आत धुळीचे कण अडकून राहतात. हवेचे शुद्धीकरण करणाऱ्या एअर प्युरिफायरसारखे ती जाळी काम करते पण त्यासाठी एअर प्युरिफायर किंवा AC प्रमाणे  विजेचा वापर करावा लागत नाही

Nano Fiber Mesh पक्ष्यांच्या आत शिरू देत नाही इतकी मजबूत आहे आणि ती जर मच्छरांपासून आपले रक्षण करते तर सूक्ष्म जीवनापासून रक्षणहि करतेच. सध्या खिडक्यांमध्ये असलेल्या Mosquito नेट ऐवजी सूक्ष्मजीव नेट, उष्णता नेट, धूलिकण नेट या तिन्हींचे काम करते. त्यामुळे कीटक नियंत्रणासाठी करण्यात येणारी औषधे, फवारणी कमी करावी लागते.

आता, ही जाळी जर एकाच क्षणी अनेक सूक्ष्म कणांना थांबवत असेल तर त्यातून पलीकडे फार कमी दिसत असेल असा गैरसमज होऊ शकतो, बरोबर? पण याचेही उत्तर 'नाही' असे आहे. सध्या वापरात असलेल्या स्टीलच्या जाळ्यांच्या नेटच्या तुलनेत Nano Fiber Meshची दृश्यमानता केवळ 10-20% कमी आहे. शिवाय स्टीलच्या जाळ्या ह्या काही काळाने गंजतात.

Comparison between SS Net and Nano Fiber Mesh
Nano Fiber Mesh (डावीकडे) आणि स्टीलची जाळी लावल्यानंतर दिसणारा फरक 

एक प्रश्न असाही उद्भवू शकतो की जर Nano Fiber Mesh लहान कण पकडून ठेवत असेल तर ती स्वच्छ करणेसुद्धा कठीण असेल. पण जाळीपासून काही अंतरावरुन फक्त पाणी फवारून ती जाळी स्वच्छ करता येते. पाणी फवारल्यानंतर खिडकीच्या चौकटीपैकी फक्त खाली ओघळणारे पाणी कापडाने टिपून
जाळीची साफसफाई क्रिया पूर्ण होते.

  • Nano Fiber Mesh का वापरावी ?

Nano Fiber Meshच्या वापरामुळे एअर कंडिशनर, एअर प्युरिफायर  यांचा वापर कमी होतो तसेच पेस्ट कंट्रोलची गरज बऱ्याच प्रमाणात कमी होतेइलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम कमी होतात. Nano Fiber Mesh संपूर्ण वर्षभर विद्युत उर्जेची बचत करते. अशा प्रकारची उपकरणे  जाळीपेक्षा नेहमीच महाग असतात आणि त्या नीट चालाव्यात म्हणून वारंवार त्याची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करावी लागते.
हवा शुद्ध करण्यासाठी आपण एअर प्युरिफायर किंवा फक्त एअर कंडिशनर लावू शकतो?
होय, पण आपण सर्व खोल्यांमध्ये एअर कंडिशनर लावत नाही आणि ते नेहमीच चालू ठेवत नाही. कारण एअर कंडिशनर किमतीने जास्त असतो आणि त्याच्या वापराने वीज बिलही वाढते.

  • एअर कंडिशनर्सचे काही दुष्परिणामही आहेत.

एअर कंडिशनर हवेतील उष्णता आणि आर्द्रता काढून तापमान, आर्द्रता आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित करते. असे करताना ते माणसाच्या त्वचेवरील पाण्याचे थेंब शोषून घेते. वास्तविक, घाम त्वचेच्या पृष्ठभागावर साचून शरीरातून अधिक पाणी बाहेर येऊ देत नाही. एसीच्या वापराने त्वचेवर जमा झालेला घाम जमा होत असतानाच शोषला जातो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी त्वचा कोरडी पडते. घशाची जळजळ, डोकेदुखी आणि श्वसनाच्या समस्या हे एअर कंडिशनरचे दुष्परिणाम असू शकतात.
त्यामुळे वीज वापरणाऱ्या उपकरणांचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा एखादा शोध आपल्याला हवाच होता. एक सामाईक अनुभव असाही आहे की एअर कंडिशनरच्या वापरानंतर काही काळाने, खोलीतील काही विशिष्ट जागा किंवा कोपरा थंड होतो.. एअर कंडिशनरप्रमाणे, एअर प्युरिफायर देखील ज्या हेतूसाठी ते बनवले जातात त्यासाठी विद्युत उर्जेचा वापर होतो. एअर प्युरिफायर हवा खेचून हवेतील कण, परागकण, धूळ आणि ऍलर्जीन पकडून ठेवतोएअर कंडिशनरवरील भार कमी करण्यासाठी, घरच्या खिडक्यांमध्ये विशिष्ट काचा वापरल्या जातात. पक्षी आणि कीटकांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी, खिडकीत वेगळ्या जाळ्यांचा वापर होतो. या सर्व वस्तू, उपकरणे वापरल्यानंतर आपण बॅक्टेरियापासून संरक्ष मिळावे म्हणून पेस्ट कंट्रोलही करतो, बरोबर?
Nano Fiber Mesh उष्णता कमी करते आणि ते उघड्या डोळ्यांना दिसणारे जीवाणू देखील प्रतिबंधित करते.

  • शुद्ध हवा घरात असण्याचे फायदे:

1.विजेचे कमी बिल 
2. श्वासोच्छवासात अडथळा  येणे 
3. उत्तम झोप
4. ऍलर्जी आणि प्रदूषकांचा प्रभाव  होणे 
5. दुर्गंधी दूर ठेवणे  
6. व्यक्ती, कर्मचारी, विद्यार्थी यांची कार्यक्षमता, एकाग्रता वाढते. 
7. डॉक्टर, दवाखाने, रुग्णालयात कमी वेळा जावे लागते आणि औषधांचे सेवन कमी होते. 
8. उत्तमी मनःस्थिती  
9. उत्तम आरोग्य

10. दीर्घ आणि चांगले जीवन. 

Nano Fiber Mesh installed in Sliding Windows
Nano Fiber Mesh, Sliding Window मध्ये लावल्यानंतर 

हा लेख वाचण्यासाठी तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल तुमचे कौतुक करतो नि आभार मानतो. धन्यवाद.
Nanofiber Dustproof Mesh बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ पहा

Nano Fiber Mesh हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु आम्हाला ज्ञात नसलेल्या अनेक उपकरणांची ते गुणवत्ता सुधारू शकते.

आमच्याशी संपर्क साधा . Lwsfacade@gmail.com वर मेलद्वारे तुमची Mesh ऑर्डर करा. 

-Pankaj Ghare.
Managing Director,
Landscape Wall Systems

Lwsfacade@gmail.com

9819 663 630

www.lwsfacade.com
 


घर आणि ऑफिसमधील हवेची गुणवत्ता घर आणि ऑफिसमधील हवेची गुणवत्ता Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on November 10, 2024 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.