माझी जन्मठेप

माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर (पुस्तकाविषयी मत). या पुस्तकाचं मी परीक्षण करू शकत नाही. 

Marathi Blog - मनात आलं म्हणून

माझी जन्मठेप

marathi blog on book by Veer Sawarkar
माझी जन्मठेप - मुखपृष्ठ 
स्वातंत्र्य आपल्याला फुकट मिळालं आहे किंवा ते तर मिळणारच होतं किंवा इंग्रज तर ठरवूनच आलेले की १५० वर्षं राज्य करून जायचं असं अनेकांना वाटत असतं. पण त्यासाठी अनेकांनी यातना भोगल्या होत्या. त्या यातनांचा कळस म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा. त्या शिक्षा निमूटपणे न भोगता तिथे अंदमानातसुद्धा विरोध, संप, चळवळ, आंदोलन, धर्मशुद्धी, शिक्षणप्रसार यांद्वारे राष्ट्रीय कर्तव्य चालू ठेवणारे बंदिवान हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते, हे ' माझी जन्मठेप ' हे सावरकरांनीच म्हटल्याप्रमाणे केवळ एकच प्रकरण आहे.

पण हे फक्त त्यांच्याच जन्मठेपेचं कथन नसून त्यांना माहीत झालेल्या इतर अनेक राजबंदीवानांच्या शिक्षा आणि कार्याबद्दल माहिती देत राहतं. गलिच्छ, बीभत्स, ओंगळवाणं थोडक्यात म्हणजे अगदी घाण जागी, घाणीत राहणं-जगणं, वाट्याला आलेलं अन्न- पाण्याचं सेवन करणं, आजारी पडल्यास उपचार मिळवणं, अंधारकोठडी, एकांतवास, अत्यंत कष्टदायी शिक्षा  त्यात धर्मबदलासाठी होणारे कपट, धर्मबदल नि छळ रोखण्यासाठी केलेले उपद्व्याप, संवाद साधण्यासाठी वापरलेल्या युक्त्या, खर्‍या राष्ट्रीय बातम्या मिळवण्याची तळमळ,  ग्रंथालय उभारण्यासाठी केलेले खटाटोप, कविता रचण्यासाठी नि पाठ करण्यासाठी केलेला भिंतीचा उपयोग, स्वत:ला नि अनेकांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी मांडलेले विचार, मध्येच कधी विनोदबुद्धीसुद्धा अशा अनेक गोष्टींची मोजकी उदाहरणं सावरकरांनी दिली आहेत.

सोबत पुस्तकाची कथा म्हणजे पुस्तकाचा जन्म, त्याचा त्या काळी झालेला खप, बंदी नि पुनः प्रकाशन दिला आहे. त्या काळातलं मराठी आणि सावरकरांनी वापरलेले काही शब्द वाचताना व्यक्तिश: मला जड गेले. तसेच बहुतेक त्या काळात संभाजीराजांबद्दल चांगलं मत नव्हतं त्यामुळे (प्रकरण १० मधील) एक वाक्य खटकलं.त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांना हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी / आहेच असं वाटत होतं हे मला नव्याने समजलं. ते सत्यनारायणची पूजा मानायचे ही गोष्ट पटली नाही. 

शाळेत असताना दहावीत ' अंदमानातून सुटका' हा धडा होता. तो खरंतर बरीच वाक्ये गाळून दिला होता कारण त्या वयात काही वाक्य / घटना वाचायला- ऐकायला- शिक्षकांना सांगायला कदाचित जमलं नसत्या. पुस्तकाचा पूर्वाध वाचताना वाटलं की पुस्तकातली अनेक प्रकरणे शाळेत वाचायला मिळाली असती तर मिळवलेल्या स्वातंत्र्याबद्दल समाजात अधिक जाण असती; पण ती प्रकरणे नि एकंदर पुस्तक वाचण्याची क्षमता अनेक पुस्तके वाचल्यानंतरच येऊ शकते.

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
माझी जन्मठेप माझी जन्मठेप Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 18, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.