सध्या कबुतरं आणि त्यांच्यामुळे पसरणाऱ्या संभाव्य आजारांचा विषय जोरात सुरू आहे. इमारतींमध्ये अनके घरांना खिडकीसमोर जाळ्या लावलेल्या दिसतात. जाळी लावली की एक समाधान मिळतं की आता काही कबूतर घरात येणार नाहीत आणि शिवाय घरातून बाहेर सुंदर दृश्य दिसेल. शिवाय बाहेरून बघताना इमारत जशी दिसते ती तशीच दिसेल. या अदृश्य जाळ्या ( invisible grills) यातून कबूतरे आत जाऊ शकत नाहीत. पण ......
🕊️ “समस्या कबूतरांची नाही...
तर कबूतरांमधून पसरणाऱ्या जंतूंची आहे!”
आजकाल दम्याचे झटके, अॅलर्जी, आणि इतर अनेक आजारांसाठी आपण थेट (आणि कदाचित फक्त) कबूतरांनाच दोष देतो.
पण ही परिस्थिती तशीच आहे जशी आपण प्लास्टिक बाटलीतून पाणी पितो आणि म्हणतो — ‘प्लास्टिक बंद व्हायला हवं’!
🦠 खरी समस्या समजून घेऊया
आपल्याला कबूतर म्हटलं की लक्षात येतो तो म्हणजे गच्चीवरचा कबुतरांचा थवा, खिडक्यांवरची विष्ठा, आणि आवाज.
पण खरा धोका कबूतरांमुळे नाही, तर त्यांच्या विष्ठेमधून, पंखांमधून आणि घरट्यांमधून पसरणाऱ्या
बॅक्टेरिया, फंगस आणि अॅलर्जन्समुळे आहे.
हे सूक्ष्म कण हवेतून सहजपणे पसरतात, घरात प्रवेश करतात, आणि आपल्या घरातील हवेच्या गुणवत्तेला ( Indoor Air Quality) ला हानी पोहोचवतात.
🌍 फक्त कबूतर नाहीत... आणखीही स्रोत आहेत!
फक्त कबूतर नव्हे , अनेक पक्षी आणि प्राणी आपल्या आजूबाजूच्या हवेला दूषित करतात:
कावळे, चिमण्या आणि सीगल्स : अन्न आणि पाण्यात बॅक्टेरिया मिसळतात
उंदीर घुशी : विष्ठा आणि चावा घेतल्याने संक्रमण पसरवतात
पाळीव प्राणी (कुत्रे, मांजरे, पोपट) — केस, डँडर आणि बॅक्टेरिया घरात आणतात
आणि अगदी आपण माणसंही, बाहेरच्या धुळीमुळे आणि कपड्यांमधून सूक्ष्म कण घरात घेऊन येतो.
अस्वच्छ परिसर, ओसंडणारे कचरा डबे, उघडी गटारं आणि बांधकामातील धूळ; या सगळ्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण हवेत आणखी वाढतं.
👉 आणि लक्षात ठेवा — जरी आपण कबूतरांना दाणे देणं थांबवलं तरी ते स्वतः: इतरत्र अन्न शोधतील... पण विष्ठा आणि जंतूंचं प्रमाण तसंच राहील.
“नष्ट करणं” हा उपाय नाही, तर “प्रतिबंध करणं” आहे.
💡 ‘Nanofiber Mesh’ – एक प्रभावी उपाय
आपल्या घरात स्वच्छ हवा टिकवण्यासाठी एक नवीन साधा उपाय म्हणजे — Nanofiber Mesh.
ही एक अत्यंत सूक्ष्म तंतूंची जाळी आहे जी फक्त स्वच्छ हवा आत येऊ देते आणि बॅक्टेरिया, धूळ, परागकण, आणि अॅलर्जन्सना बाहेरच थांबवते.
🔹 Nanofiber Mesh चे मुख्य फायदे:
✨ फक्त 0.38mm जाडीचे — हलके पण टिकाऊ
✨ Sliding Window मध्ये सहज बसवता येते (काच किंवा मच्छरजाळीप्रमाणे)
✨ Velcro किंवा PVC स्ट्रिप्स ने बसवण्यास सोपे
✨ PM2.5, Fine Dust, Pollen, Bacteria, Fly Ash, Water Droplets, Allergens यांना थांबवते
✨ UV आणि IR किरणांपासून संरक्षण, घरातील उष्णता कमी
✨ जाळीतून फक्त हवा जाऊ शकते.
✨ गंजत नाही, आणि फक्त पाणी शिंपडून ( ५-६ महिन्यांनी ) जाळी स्वच्छ होते.
🌱 स्वच्छ समाज घरापासूनच सुरू होतो
इथे समस्या फक्त कबूतरांची नाही. ती आपल्या एकंदर परिसर स्वच्छतेची आणि हवेच्या गुणवत्तेची आहे.
जर आपण स्वच्छता, जागरूकता आणि Nanofiber Mesh सारख्या आधुनिक फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजीला एकत्र आणलं, तर आपण आरोग्यदायी घरं तयार करू शकतो. विजेचा वापर न करता. Air Purifier चा वापर न करता.
👉 घरात प्रवेश करणारी हवा आपण खिडकीतच स्वच्छ करू शकतो . Nanofiber Mesh चा उपाय गेली काही वर्षे जगात उपलब्ध आहे.
Nanofiber Mesh बसवा — आणि कबूतरांचे जंतू नाही, फक्त स्वच्छ हवा आत येऊ द्या.
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
November 07, 2025
Rating:

No comments: